- आदर्शवत व्यक्तीमत्व
देवीचे रूप आईत आहे, देवीचे रूप बहिणीत आहे, देवीचे रूप पत्नीत आहे, देवीचे रूप मुलीत आहे, प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी रुपांचा उत्सव-जागर होत असताना आजच्या युगातील प्रत्येक स्त्री शक्तीलाही आदरयुक्त प्रणाम…. देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने ‘स्काय न्यूज टुडे’ वेब टीमच्या माध्यमातून नवदुर्गा या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….

मेहनत, सातत्य आणि बुद्धिमत्तेची जोड असेल तर यशाचा मार्ग हा नेहमीच सुलभ होतो. याच मार्गांवर वाटचाल करत यश संपादन केलेली अनेक व्यक्तिमत्व सामाजिक पटलावर दिसून येतात. त्यापैकीच एक आदर्शवत महिला नेतृत्व मालवणच्या सौ. वैशाली विकास गांवकर या होय.
वैशाली गावकर यांनी मध्यंतरीच्या काळात मालवण मध्ये क्लासेस च्या माध्यमातूनही विद्यार्थ्यांना घडवलं आहे कोकण नाऊच्या यशात त्यांचा मोलाचा वाटा आहे त्यांचे पती विकास गावकर यांनी झी 24 तास च्या माध्यमातून अनेक वर्ष काम केलं प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो वैशाली गावकर यांच्या माध्यमातून विकास गावकर आणि त्यांचा मुलगा ओमकार यांच्या यशाचा आलेख नेहमीच उंचावता राहिला आहे. घर आणि व्यवसाय अशा दोन्ही पातळ्यांवर वैशाली गावकर यांनी काम केलं आहे. मालवण मधील यशस्वी स्त्री म्हणून त्यांनी काम केलं आहे एकतर घर किंवा व्यवसाय अशा दोन्ही पातळीवर यशस्वी होणं खूप अवघड असतं मात्र वैशाली गावकर यांनी नेहमीच या दोन्ही पातळ्यांवर यशस्वी होत काम केलं आहे मालवणी शहरात त्यांचा मोठा चाहता वर्ग असून अनेक महिलांना प्रोत्साहन देण्यातही वैशाली गावकर यांचे मोठे योगदान आहे

माहेर आणि सासर अश्या दोन्ही बाजूने उच्चशिक्षित व उच्चपदस्थ कुटुंबातील सौ. वैशाली गांवकर यांचा जिवनप्रवास मेहनत, सातत्य या माध्यमातून यशस्वीतेच्या दिशेने राहिला आहे. एलआयसी पॉलिसी च्या माध्यमातून गेली अनेक वर्षे जनमाणसांशी जोडले राहून आपल्या कामातून आदर्शवत अशी यशस्वी झेप त्यांनी घेतली आहे. सोबतच कोकण नाऊ चॅनलच्या माध्यमातून पती विकास गांवकर यांच्या सोबतीने संचालक पदाची जबाबदारी त्या यशस्वीपणे पार पाडत आहेत. अनेकांना रोजगार उपलब्ध करून देताना चॅनलच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक बांधिलकीही जोपासली आहे.
सौ. वैशाली विकास गावकर यांचा जन्म मुंबई प्रभादेवी येथे झाला. त्यांचे आजोबा व वडील मुंबई हायकोर्टात सेवेत होते. सेवानिवृत्तीनंतर ते मूळ गांव कट्टा गुरामवाड येथे गावी आले.
सौ. वैशाली तथा संजीवनी दत्तात्रय घोगळे (माहेरचे नाव) या परिवारासोबत गावी आल्या. त्यांचे शिक्षण वराडकर हायस्कूल आणि मालवण सिंधुदुर्ग कॉलेज येथे झाले. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथे टॅक्स कन्सलटंट कोर्स केला. 1999 मध्ये त्यांचं लग्न विकास संभाजी गावकर यांच्याशी झाले.
सौ. वैशाली या लग्नाच्या आधी मालवणी बाजार मध्ये सेवेत होत्या. त्यांना अभ्यासाची आवड होते तसे त्यांना खेळाची देखील आवड होती. त्यानी जिल्हास्तरीय खो-खो, रनिंग स्पर्धा मध्ये सहभाग घेत यश संपादन केले. दरम्यानच्या काळात त्यांनी क्लासेस पण घेतले. त्यांना वाचनाची आवड आहे. तसेच पूजापाठ ही त्या नित्यनियमाने करतात. त्यांचा मुलगा शिक्षण पुर्ण करत सिव्हील इंजिनियर आहे.


सौ. वैशाली गांवकर यांनी 2003 एलआयसी मध्ये जॉईन होत पॉलिसी घ्यायला सुरुवात केली. यावर्षी 30 सप्टेंबर पर्यंत 121 पॉलिसी घेऊन मालवण शाखेतील त्या 2024-25 च्या पहिल्या शतकवीर ठरल्या. एलआयसीच्या माध्यमातून त्यांनी आदर्शवत काम केले. क्षेत्र कोणतेही असो सातत्यपुर्ण प्रामाणिक कामातून यशाचा मार्ग त्यांनी सुखर केला. इतरांसाठी आदर्श निर्माण केला आहे.

प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे पत्नीचा साथ महत्वपूर्ण असते. याचे मूर्तिमंत उदाहरणं सौ. गांवकर दाम्पत्याच्या माध्यमातून दिसून येतो. पती विकास गांवकर यांच्या सोबत कोकण नाऊ चैनलच्या त्या संचालिका आहेत. आपल्या परीने त्या ठिकाणीही त्या योगदान देतं असतात. कोकण नाऊच्या माध्यमातून कोकण महोत्सव, विविध स्पर्धा, क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून ग्रामीण भागातील मुलांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला आहे. कोरोना काळामध्ये दशावतार कलाकारांना देखील आर्थिक मदत मिळवून दिली आहे. सामाजिक कार्यातूनही त्यांनी ओळख निर्माण केली आहे. मात्र दिखावा, मोठेपणा यापासून त्या नेहमीच दूर राहिल्या. त्यांच्या स्वभावातील नम्रपणा हे त्यांच्या वैशिष्ठ गुणांपैकी शीर्ष स्थानी राहिले.

सौ. वैशाली विकास गांवकर यांची यशस्वी वाटचाल अशीच सुरु राहो. त्यांना पुढील वाटचालीसाठी स्काय न्यूज टुडे परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा….!!!

