Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सौ. शितल अनिल साठे

सौ. शितल अनिल साठे
  • यशस्वी उद्योजिका

💐 नवदुर्गा : पुष्प नववे 💐

देवीचे रूप आईत आहे, देवीचे रूप बहिणीत आहे, देवीचे रूप पत्नीत आहे, देवीचे रूप मुलीत आहे, प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना आजच्या युगातील प्रत्येक स्त्री शक्तीलाही आदरयुक्त प्रणाम….
देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने ‘स्काय न्यूज टुडे’ वेब टीमच्या माध्यमातून नवदुर्गा या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….

ब्रँडेड कपडे माफत दरात महिलां व मुलींना उपलब्ध करून द्यावेत, या संकल्पनेतून सौ. शितल अनिल साठे यांनी मालवणात व्यवसायाची महुर्तमेढ सहा वर्षा पूर्वी रोवली. ग्राहकांची पसंती वाढत गेली. प्रतिसाद वाढत गेला. 'फॅशन गॅलेक्सी ब्युटीक' आज ब्रँडेड कपड्यांचे हक्काचे दालन बनले आहे. दर्जा आणि तत्पर सेवा या माध्यमातून सौ. शितल साठे यांच्या 'फॅशन गॅलेक्सी ब्युटीक' सोबत अनेक महिला, मुली ग्राहक जोडत राहिले. आज फॅशन गॅलेक्सी ब्युटीक हा ग्राहकांच्या हक्काचा ब्रँड बनला आहे.

सौ. शितल अनिल साठे उर्फ शितल मच्छिंद्र बढे (माहेरचे नाव) यांचा जन्म पुणे शिरूर येथे झाला. व्यावसायिक पार्श्वभूमी असलेले त्याचे माहेर जवळपास १५० जणाचे मोठे कुटुंब आहे. त्यांचे वडील हे व्यावसायिक आहेत. सौ. शितल साठे यांनी सायकॉलॉजी मधून ग्रॅज्युएशन करून हिस्ट्री विषय घेऊन M. A. केले आहे. मालवण सिंधुदुर्ग सागरी सुरक्षा दलात PSI पदावर कार्यरत असणारे कर्तव्यदक्ष अधिकारी अनिल बबन साठे यांच्याशी २९ डिसेंबर १९९९ मध्ये त्यांचा विवाह झाला. सौ. शितल यांचे सासरे व दिर हे भारतीय सैन्य दलात कार्यरत आहेत. अभिमान वाटावे असे हे कुटुंब आहे.

२०११ पासून साठे कुटुंब मालवण येथे वास्तव्यास आहेत. त्यांना एक मुलगा व मुलगी असून मुलगा कम्प्युटर इंजिनिअरिंग करून नोकरीला आहे. तर मुलगी बारावी मध्ये शिकत आहे. मुलांचे शिक्षण रोझरी इंग्लिश मिडीयम स्कुल मालवण येथे झाले. त्या ठिकाणी अनेक वर्षे पीटीए मेंबर म्हणून सौ. शितल साठे यांचे योगदान राहिले.

कोरोना काळात सर्वच उद्योग व्यवसाय ठप्प होते. काही कालावधी नंतर निर्बंध काहीसे शिथिल होत असताना ऑनलाईन सेवाना प्राधान्य मिळतं होते. याचं काळात सौ. शितल साठे यांनी शहरांच्या धर्तीवर ब्रँडेड कपडे मालवण वासियांना उपलब्ध केले. उत्तम दर्जा, तत्पर सेवा आणि माफक दर या त्री सूत्रीच्या माध्यमातून सौ. साठे यांचे 'फॅशन गॅलेक्सी ब्युटीक' हे दालन अल्पावधित ग्राहकांची पसंती ठरले.

संपूर्ण महाराष्ट्र, भारत, आणि विदेशात ऑनलाइन बुकिंग करून कुरियर सेवा दिली जाते. त्यासोबतच अगदी छोट्यातल्या छोट्या गावात देखील पार्सल सेवा पोहचवली जाते.छोट्या गावात, वाडीत आजही बऱ्याच गोष्टी मिळत नाहीत, त्यामुळे त्यांचा या कार्याचे खरच कौतुक आहे.

पाच वर्षांपूर्वी कमी प्रमाणात घरातून सुरू केलेला हा व्यवसाय सर्व क्षेत्रातील महिला वर्गाच्या प्रतिसादातून विस्तारत गेला. वर्ष भरापूर्वी त्यांनी मालवण भरड नाका याठिकाणी प्रशस्त असे फॅशन गॅलेक्सी ब्युटीक दालन सुरू केले. मुली, महिलांची पसंद यांच्या अंदाज घेऊन अर्थात मागणी नुसार दर्जात्मक उपलब्धता दिली. ग्राहकांशी मनमिळावू पणे वागण्याचा त्यांचा स्वभाव यामुळे ग्राहक वाढू लागले. एक यशस्वी उद्योजिका म्हणून त्यांनी नावलौकिक प्राप्त केला आहे.

त्यांच्या व्यवसायामध्ये त्यांना कुटुंबाचा खंबीर पाठिंबा आहे. पती, मुले यांची साथ लाभली. व्यवसायाची सहा वर्षे यशस्वीपणे पुर्ण झाली.

सौ. शितल साठे यांचा सामाजिक कार्यातही सहभाग व योगदान देण्याचा प्रयत्न नेहमीच राहिला. रक्तदान शिबिरांमध्ये रक्तदान करणे. तसेच ऑर्गन डोनेशनचा ही फॉर्म त्यांनी भरला आहे. त्यांना वाचनाची, गाणे ऐकण्याची आवड आहे. यशस्वीपणे त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे.

महिला व मुलींची पसंती ठरलेले त्यांचे फॅशन गॅलेक्सी ब्युटीक अधिकाधिक विस्तारत राहो. सौ. शितल साठे यांना पुढील वाटचालीसाठी स्काय न्यूज टुडे परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा….!!!

************************************************************************************************

https://www.youtube.com/playlist?list=PLrVSFrGEjrLS9gbWgbfsuvcR8d85IbNfj

ruchira top