Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कु. श्रुतिका आनंद मोर्ये

कु. श्रुतिका आनंद मोर्ये

  • महिला पखवाज वादक

💐 नवदुर्गा : पुष्प आठवे 💐

देवीचे रूप आईत आहे, देवीचे रूप बहिणीत आहे, देवीचे रूप पत्नीत आहे, देवीचे रूप मुलीत आहे, प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना आजच्या युगातील प्रत्येक स्त्री शक्तीलाही आदरयुक्त प्रणाम….
देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने ‘स्काय न्यूज टुडे’ वेब टीमच्या माध्यमातून नवदुर्गा या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….

नवदुर्गा : कु. श्रुतिका आनंद मोर्ये

आजकाल असं कोणतंच क्षेत्र राहिलेलं नाही कि ज्यामध्ये पुरुषांच्या बरोबरीने महिला नाहीत. महिलांनी अगदी अंतराळात जाण्यापासून प्रत्येक क्षेत्रात आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे. कला क्षेत्रात तर महिला अगदी पूर्वीपासूनच आहेत. गायन-वादन या क्षेत्रात सुद्धा महिलांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे, करत आहेत.

अशाच एका पखवाज वादनाच्या क्षेत्रात आपल्या जिल्ह्याचं नाव उंचावत आहेत त्या कुडाळ तालुक्यातील आंदुर्ले गावची कन्या कु. श्रुतिका आनंद मोर्ये. नुकताच श्रुतिका यांनी मुंबई विद्यापीठस्तरावर आपला ठसा उमटविला आहे. अलीकडेच झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात त्यांच्या गुणवत्तेची दखल मोठमोठया दिगज्जनांनी सुद्धा घेतली आहे. विभागीय स्तरावरील कामगिरी वरून श्रुतिका यांची मुंबई विद्यापीठाच्या चमूत निवड झाली असून आंतरविद्यापीठ स्तरावर मुंबई विद्यापीठाचं प्रतिनिधित्व करणार आहे.

असं म्हटलं जातं पखवाज किंवा मृदूंग हे वाद्य वाजवण्यासाठी कौशल्यासोबत ताकदीची गरज असते. पखवाज हे जोरकस आणि मर्दानी वाद्य आहे. त्यामुळे महिला या वाद्याच्या वाट्याला जात नव्हत्या. सर्रास पुरुष मंडळीच हे वाद्य वाजवताना पाहायला मिळतात. पण श्रुतिका या अपवाद ठरल्या. त्याला कारणही तसेच आहे. श्रुतिकाचे वडील आनंद मोर्ये हे सुप्रसिद्ध पखवाज वादक. अगदी समजायला लागायाच्या आत श्रुतिकांच्या कानावर पडले ते पखवाजाचे बोल. आणि साहजिकच श्रुतिकाला पखवाजाच्या त्या तालाने आकर्षित केलं. बालवाडीत असल्यापासूनच घरी असलेला पखवाज त्या वाजवू लागल्या.

वडिलांचाही ते लक्षात येत होत. त्याप्रमाणे त्यांनी मुलीला धडे द्यायला सुरुवात केली. अगदी कोवळ्या वयातच तालबद्ध आकार यायला सुरुवात झाली. आवड असली कि सर्व गोष्टी समजायला सोप्या होतात असं म्हटलं जात. पखवाज वादनाची असलेली आवड आणि घरात असलेलं वातावरण यामुळे श्रुतिका यांनी पखवाजाचे धडे आतमसत करायला सुरुवात केली.

आज श्रुतिका या कुडाळच्या संत राऊळ महाराज महाविद्यालयात एफवायबीएच्या वर्गात शिकत आहे. पण पखवाज मध्ये त्या विशारद झाली आहे. सध्या त्या अलंकार परीक्षेसाठी वडिलांच्या मार्गदर्शनाखाली रियाज करत आहे. पखवाज सोबतच ढोलकी, ढोलक, डिमडी अशी तालवाद्य लीलया वाजवतात, पण विशेष प्रेम आहे ते पखवाजवर.

अगदी शालेय जीवनापासूनच श्रुतिका वेगवगळ्या कार्यक्रमात पखवाज साथ करू लागल्या. सातवीत असताना कुडाळ हिंदू कॉलनीत साई मंदिरात झालेल्या कार्यक्रमात पहिल्यांदा पखवाज साथ केली होती. त्याचबरोबर गोव्यात देखील कार्यक्रमात त्यां पखवाज साथ करतात. प्रसिद्ध कीर्तनकार आफळेबुवांच्या कीर्तनात देखील पखवाज साथ केली आहे. त्याचबरोबर कीर्तन महोत्सवात वडिलांसोबत कीर्तन साथ करायला असतेच. अनेक भजनांमध्ये सुद्धा भजनी बुवांना कीर्तनसाथ करून त्यांची वाहवा मिळविली आहे.

श्रुतिका हिला तिच्या वडिलांनी पखवाजाचे धडे दिले असले तरी एखादी नवीन चीज किंवा ताल तिला शिकायचा असेल तर वडील तो थेट शिकवत नाहीत. अगोदर तिला ऐकून प्रयत्न करायला सांगतात आणि मग त्यातले बारकावे समजावून सांगतात. त्यामुळे स्वतः विचार करण्याची सवय लागल्याचं श्रुतिका सांगतात.

पखवाजाचे ताल हे मुखाने बोलावे लागतात. त्यामुळे वाणी शुद्ध होते. जिभेला वळण लागते. आणि अजून शुद्ध होण्यासाठी अनेक स्तोत्र, संस्कृत ज्ञानेश्वरी वाचून अभ्यास करत आहे. तिला पुढे जाऊन काय करायचे याचे धेय्य ठरलेले आहे. पखवाजमध्येच एमए करायचे आहे. त्या दृष्टीने तयारी सुरु आहे.

अनेक मान्यवरांनी श्रुतिकाच्या पखवाज वादनाचे कौतुक केलं आहे. मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात तर विद्यापीठ स्तरावर पखवाज वादन करणारी श्रुतिका हि पहिली मुलगी असल्याचं मुंबई विद्यापीठाचे युवा महोत्सव समानव्यक निलेश सावे यांनी सांगून कौतूक केलं आहे. त्याच बरोबर तिचे वडील आनंद मोर्ये यांचे गुरु सुप्रसिद्ध पखवाज वादक माउली सावंत यांनी तर 'कुदवसिंह घराणे हि मुलगी पुढे चालवेल' या शब्दात कौतुक केले आहे. वडिलांसोबतच प्रसाद मेस्त्री यांचे मार्गदर्शन सुद्धा मिळत आहे.

सध्या श्रुतिका यां मुंबई विद्यापीठासाठी आंतर विद्यापीठ युवा महोत्सवाची तयारी करीत आहे. त्यासाठी आता मुंबई विद्यापीठाच्या टीम मध्ये सहभागी होणार आहे. तिथे महिनाभर तिचा रियाज सुरु राहणार आहे. त्यांनतर नोव्हेम्बर महिन्यात या स्पर्धा होणार आहेत. तिच्या पखवाज वादनासाठी संत राऊळ महाराज महाविद्यालयचे तिला नेहमीच पूर्ण सहकार्य मिळत असल्याचे श्रुतिका यांनी सांगितले.

एक वेगळं क्षेत्र श्रुतिका यांनी निवडले आहे. या पखवाज वादनाच्या क्षेत्रात मुली कमी आहेत. पण आता काही मुली या क्षेत्राकडे वळत आहेत. हि आशादायक गोष्ट आहे. जास्तीजास्त मुलींनी या क्षेत्राकडे वळलं पाहिजे असं श्रुतिका यांना वाटत.

एवढी वेगळी गुणवत्ता असून सुद्धा श्रुतिका नम्रता आहेत. प्रसिद्धी पासून चार हात दूरच असतात. आजकाल जरा काही झाली कि सोशल मीडियावर आपले व्हिडियो अपलोड करण्याच्या जमान्यात श्रुतिका दूरच. मात्र आपले व्हिडीओ लोकच शूट करून अपलोड करत असतात असं त्या सांगतात. माझं काम रियाज करणं आहे आणि ते मी करत राहणार असं श्रुतिका नम्रपणे सांगतात. श्रुतिका यांच्या पुढील वाटचालीसाठी तिला स्काय न्यूज टुडे परिवाराकडून मनःपूर्वक शुभेच्छा….!!!

✒️ सीनियर रिपोर्टर : निलेश जोशी

ruchira top