Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

नवदुर्गा : सौ. नेहा गणेश कोळंबकर

नवदुर्गा : सौ. नेहा गणेश कोळंबकर

  • सामाजिक आणि उद्योग क्षेत्रातील कर्तृत्ववान नेतृत्व

💐 नवदुर्गा : पुष्प सहावे 💐

देवीचे रूप आईत आहे, देवीचे रूप बहिणीत आहे, देवीचे रूप पत्नीत आहे, देवीचे रूप मुलीत आहे… प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना आजच्या युगातील प्रत्येक स्त्री शक्तीला आदरयुक्त प्रणाम….
देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने 'स्काय न्यूज टुडे’ वेब टीमच्या माध्यमातून नवदुर्गा या सदरातून स्त्री शक्तींच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….

प्रत्येक महिला ही देवीचेच रूप असते. हीच महिला रुपी देवी नानाविध रूपांनी समाजात वावरत असते. सामाजिक क्षेत्रात सतत कार्यरत राहून समाजात आदर्श निर्माण करत असते. पतीच्या उद्योग व्यवसायात समर्थपणे साथ देत असते. अश्याच एक नारीशक्ती मालवणच्या सौ. नेहा गणेश कोळंबकर या होय. नेहा यांचे रक्तदान चळवळीतील योगदान बहुमूल्य असे आहे. मात्र प्रसिद्धी, मोठेपणा यापासून नेहमीच दूर असणारे हे व्यक्तिमत्व आदर्श असेच आहे.

सौ. नेहा गणेश कोळंबकर पूर्वीचे (माहेर) नाव नेहा मेघश्याम शंकरदास…. मालवण येथील सामाजिक कार्यकर्ते मेघश्याम अर्थात राजा शंकरदास यांची नेहा ही कन्या. नेहा यांचे शिक्षण बीकॉम पर्यंत झाले. त्यानंतर कोळंब येथील हॉटेल उद्योजक गणेश कोळंबकर यांच्याशी नेहा यांचा विवाह १ नोव्हेंबर २००९ या वर्षी झाला.

पतीच्या हॉटेल व्यावसायात नेहा यांची खंबीर साथ लाभली. सेवा आणि गुणवत्ता या जपणुकीतून हॉटेल व्यवसाय वाढत गेला. आज आघाडीच्या हॉटेल मध्ये गणेश, नेहा यांच्या हॉटेल 'मालवणी' चा नावलौकिक आहे. याचे श्रेय गणेश हे पत्नी नेहा यांना देतात. तिची साथ, स्वामीकृपा आणि ग्राहकांचे प्रेम यामुळे हे शक्य झाल्याने ते सांगतात.

नेहा यांचे सामाजिक क्षेत्रातही मोठे योगदान नेहमीच राहिले आहे. मात्र फोटो, प्रसिद्धी यापासून नेहा या नेहमीच दूर असतात. जे करायचे ते प्रामाणिकपणे, कोणताही दिखावा त्यांच्या कार्याचा कधीच नसतो. रक्तदान व अन्य सामाजिक क्षेत्रात कार्यरत राहून गरजूना मदत व्हावी म्हणून त्यांचे सेवकार्य सुरु असते. आपण ज्या समजात राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देण लागतो म्हणून फक्त छोटीशी धडपड बाकी काही नाही, मी मोठे काहीही केले नाही, असे त्या सांगतात. त्या स्वतःही वयाच्या १८ वर्षापासून रक्तदान करत आल्या आहेत. आतापर्यत २५ वेळा तरी रक्तदान केले. ग्लोबल रक्तदाते परिवाराच्या माध्यमातून रक्तदान चळवळीत त्या सक्रियपणे कार्यरत असतात. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचे नेहमीच योगदान असते.

एकूणच या कर्तृत्ववान नवदुर्गेचा जिवन प्रवास पुढील काळातही सुखद व आनंददायी राहो. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो. हीच ईश्वर चरणी प्रार्थना. स्काय न्यूज टुडे परिवाराच्या वतीने सौ. नेहा गणेश कोळंबकर यांना लक्ष लक्ष शुभेच्छा.

ruchira top