Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

नवदुर्गा : सौ. अदिती चंदन दळवी

नवदुर्गा : सौ. अदिती चंदन दळवी
  • कलेच्या उपासक

💐 नवदुर्गा : पुष्प तिसरे 💐

देवीचे रूप आईत आहे, देवीचे रूप बहिणीत आहे, देवीचे रूप पत्नीत आहे, देवीचे रूप मुलीत आहे. प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना आजच्या युगातील प्रत्येक स्त्री शक्तीलाही आदरयुक्त प्रणाम.
देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने 'स्काय न्यूज टुडे’ वेब टीमच्या माध्यमातून नवदुर्गा या सदरातून स्त्री शक्तीच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….

एखाद्या गोष्टीची अगदी मनापासून आवड असली कि मग कितीही संकटं आली तरी त्या आवडीच्या गोष्टी करता येतात असं म्हटलं जात. फक्त आपल्या कामावर परमेश्वरावर श्रद्धा हवी. अगदी हीच गोष्ट कुडाळच्या सौ. अदिती चंदन दळवी याना भेटल्यावर जाणवते. याच आहेत आपल्या आजच्या नवदुर्गा. कलेच्या उपासक सौ. अदिती चंदन दळवी.

कुडाळची कुडाळेश्वरवाडी म्हणजे कलेचं माहेरघर म्हटलं जातं. श्री देव कुडाळेश्वराच सानिध्य आणि कृपाशिर्वाद येथील रहिवाशांना नेहमीच लाभले आहेत. याच वाडीत सौ. अदिती यांचा घाटकरांच्या घरात जन्म झाला. सौ. अदिती हे लग्नानंतरचं नाव असलं तरी आशा हे त्यांचा माहेरचं नाव. आशा महादेव घाटकर. कुडाळेश्वर वाडीत राहत असल्याने रामनवमी वगैरे उत्सवाच्या निमित्ताने कुडाळेश्वर मित्र मंडळाच्या माध्यमातून विवीध सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे. त्या कार्यक्रमातून सौ. अदिती भाग घेऊ लागल्या. मुळातच असलेली नृत्य कलेची आवड त्यामुळे बहरू लागली. छोट्या मोठ्या नाटकातून अभिनय सुद्धा सुरु होता.
सौ. अदिती यांच्या माहेरची परिस्थिती त्यावेळी बेताचीच होती. त्यामुळे आवड असून सुद्धा त्यांना बारावीच्या पुढे शिकता आले नाही. शिकत असताना सुद्धा रुग्णालयात नर्सचे काम केले. ती सेवावृत्ती अजूनही त्यांनी जोपासली आहे. आजही त्या रुग्णसेवा करत असतात.

नामांकित अभिनेत्री वर्षा सामंत-वैद्य यांना सौ. अदिती या आपल्या गुरु मानतात. त्यांनीच त्यांना नृत्य शिकवले. त्यावेळी विविध नृत्याच्या स्पर्धांमधून त्या भाग घ्यायच्या. अनेक ठिकाणी त्यांनी त्यासाठी बक्षिसे मिळविली आहेत. कुडाळेश्वर मित्र मंडळाने सादर केलेला चैत्र पालवी या कार्यक्रमाने त्या खऱ्या अर्थाने रंगभूमीवर आल्या. त्यांनतर कुडाळेश्वर मित्र मंडळ आणि बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ निर्मित गीत श्री साई कथामृत या नाटकातून त्यांनी भूमिका साकारली. पुढे हे नाटक व्यावसायिक स्वरूपात रंगभूमीवर आलं त्यावेळी सुद्धा त्या नाटकात सौ. आदिती यांनी काम केलं होत.

बारावी झाल्यांनतर सौ. अदिती या मुंबईला गेल्या. तिथे त्यांनी ब्युटिशियन आणि हेअर ड्रेसरचा कोर्स केला. त्यासाठी नामांकित रंगभूषाकार विलासदादा कुडाळकर यांचे त्यांना मोलाचे मार्गदर्शन मिळाले. हेअर ड्रेसर म्हणून त्यांनी फिल्म इंडस्ट्रीत सुद्धा काही काळ काम केलं. त्याच वेळी त्यांची मैत्रीण रचना खापरे यांच्या ग्रुप मधून त्या नृत्याचे कार्यक्रम करू लागल्या. एकीकडे काम आणि दुसरीकडे आपली नृत्याची आणि कलेची आवड त्या जोपासत होत्या. वेगवेगळ्या बॅनर खाली त्यांनी नृत्याचे कार्यक्रम सादर केले.
त्यांनतर त्या कुडाळला आल्या.

चंदन दळवी यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संसार सुरु झाला. पण कलेची आवड काही स्वस्थ बसू देत नव्हती. लहान मुलामुलींचे डान्स बसवताना काही मुलांच्या पालकांनीच त्यांना डान्स क्लासेस सुरु करण्याची आयडिया दिली आणि त्यांच्या डान्स क्लासची सुरुवात झाली. कलनक्षत्र, सिद्धाइ आणि आता संकल्प क्रिएशन असा त्यांचा प्रवास झाला आहे.

कुडाळमध्ये संकल्प क्रिएशन नावाची त्यांनी कला अकादमी आहे. विविध प्रकारची नृत्य, अभिनय अशा कलांचे त्या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाते. सौ. अदिती यांनी अनेक कलाकार घडविले आहेत. उन्हाळी सुट्टीत शिबिरे सुद्धा घेतली जातात.

राज्य नाट्य स्पर्धेत सुद्धा सौ. आदिती यांनी ऑनस्टेज आणि बॅकस्टेज यश मिळविले आहे. सुप्रसिद्ध रंगकर्मी केदार देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेतील यशस्वी नाटकातून भूमिकाही साकारल्या आहेत आणि रंगभूषाकार म्हणून सुद्धा काम केलं आहे. रंगभूषेसाठी त्यांना प्रथम क्रमांक देखील मिळला आहे.

सौ. अदिती यांनी आपल्या सासूबाईंच्या नावे सौ. प्रतिभा दळवी गुरुकुल बालवाडी देखील दोन वर्षांपूर्वी सुरु केली. त्याच बरोबर गेली १५ वर्ष संकल्प क्रिएशनच्या माध्यमातून कला शिक्षण देण्याचा वसा त्यांनी घेतला आहे.

कुडाळेश्वर दशावतार ह्या माध्यमातून त्या महिला दशावतारसुद्धा करतात. त्याचे अनेक प्रयोग त्यांनी जिल्ह्यात केले आहेत. कुडाळेश्वर महिलामंडळ, मराठा समाज भगिनी मंडळ यांच्या माध्यमातून विविध कार्यक्रम सुरु असतात. त्यात सौ. अदिती यांचा सक्रिय सहभाग असतो. महिला दिनाचे वगैरे कार्यक्रम केले जातात. सौ. अदिती अजूनही विविध स्पर्धात सहभागी होत असतात. त्याच बरोबर कोकणची लोककला फुगडी सुद्धा त्यांनी जपली आहे. त्यांचे फुगडी मंडळ सुद्धा आहे. त्याचे देखील विविध कार्यक्रम होत असतात.

समाजाने सुद्धा त्यांची दखल घेतली आहे. अनेक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. चिमणी पाखरं पुरस्कार, कुडाळेश्वर मित्र मंडळाचा पुरस्कार अशा आईंक पुरस्कारांनी सौ. अदिती याना गौरविण्यात आलं आहे.

पती चंदन दळवी यांचा त्यांच्या यशात खूप महत्वाचा वाटा असल्याचे त्या सांगतात. संकल्प हा त्यांचा मुलगा सुद्धा कलेचे शिक्षण घेत आहे. मुंबईला तो फाईन आर्टच शिक्षण घेत आहे. सासर, माहेर दोन्हीकडून त्यांच्या कलेला नेहमीच प्रोत्साहन मिळाल्याने मनासारखे काहीतरी करता आल्याचे सौ. अदिती समाधानाने सांगतात.

सध्या सौ. अदिती दळवी या उत्कृष्ट ब्युटिशियन म्हणून कुडाळमध्ये परिचित आहेत. त्यांचे स्वतःचे ब्युटी पार्लर सुद्धा आहे. अनेक स्पर्धांच्या परीक्षणासाठी त्यांना आवर्जून बोलावलं जात.

स्त्रीने ठरवलं तर ती काहीही करू शकते. बऱ्याच वेळा परिस्थिती अनुकूल नसते. पण ते आव्हान स्वीकारून स्त्री पुढे जाते यशस्वी होते. सौ. अदिती दळवी यांच्या बाबत सुद्धा असेच म्हणावे लागले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी स्काय न्यूज टुडे परिवाराकडून त्यांना उदंड शुभेच्छा !!!!

https://www.youtube.com/playlist?list=PLrVSFrGEjrLS9gbWgbfsuvcR8d85IbNfj

ruchira top