Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

नवदुर्गा : सौ. अनुष्का प्रशांत गांवकर

नवदुर्गा : सौ. अनुष्का प्रशांत गांवकर
  • सामाजिक क्षेत्रातील नेतृत्व

💐 नवदुर्गा : पुष्प दुसरे 💐

देवीचे रूप आईत आहे, देवीचे रूप बहिणीत आहे, देवीचे रूप पत्नीत आहे, देवीचे रूप मुलीत आहे. प्रत्येक स्त्री रुपात देवी आहे. नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने सर्वत्र देवी नवदुर्गा रुपांचा उत्सव-जागर होत असताना आजच्या युगातील प्रत्येक स्त्री शक्तीलाही आदरयुक्त प्रणाम.
देवीच्या उत्सवाच्या निमित्ताने 'स्काय न्यूज टुडे’ वेब टीमच्या माध्यमातून नवदुर्गा या सदरातून स्त्री शक्तीच्या प्रतिभासंपन्न कार्यकर्तृत्वाला प्रणाम….

सर्वसामान्य जनतेचे दुःख जाणून त्यांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणारी अनेक देवरुप व्यक्तिमत्व समाजात सेवाकार्य करत असतात. ना कोणता गाजावाजा ना मोठेपणा. आपले काम करत राहायचे या भावानेतून कार्यरत असणारे मालवण तालुक्यातील आचरा हिर्लेवाडी येथील असेच एक महिला नेतृत्व सौ. अनुष्का प्रशांत गांवकर या होय.

सर्वासामान्य कुटुंबात जन्मलेल्या सौ. अनुष्का यांचा जिवन प्रवास आव्हानात्मक राहिला. मात्र आपल्या कार्यकर्तृत्वातून नवी आव्हाने स्वीकारत सौ. अनुष्का यांची वाटचाल यशस्वीतेच्या दिशेने राहिली. सोबतच सामाजिक कार्यात आपला ठसा त्यांनी उमटवला. महाराष्ट्र शासन महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने आचरा ग्रामपंचायत क्षेत्रात दिला जाणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार 2023-24 हा सौ. अनुष्का गावकर यांच्या सामाजिक क्षेत्रातील कार्याचा सन्मान ठरला.

अनुष्का गावकर सांगतात, पहिल्यापासून विविध कला आत्मासात केल्या. त्याचे व्यवसायात रूपांतर केले. आईस्क्रीम पार्लर, कोल्ड्रिंक्स या सोबत टेलरिंग व ब्युटी पार्लर या व्यवसायात त्या कार्यरत आहेत.

2018 पासून ग्रामपंचायत सदस्य म्हूणन त्या जनसेवेत कार्यरत आहेत. सौ. अनुष्का यांची सर्वसामान्य जनतेप्रति असलेली आस्था, सेवाकार्य करण्याची वृत्ती पाहून आ. वैभव नाईक यांनी त्यांची शिफारस संजय गांधी श्रावणबाळ योजना समितीत केली. त्या ठिकाणी नियुक्ती नंतर अधिकाधिक लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यायचा प्रयत्न सौ. अनुष्का यांचा राहिला. त्यात त्या यशस्वी ठरल्या.

आचरा गाऊडवाडी येथील दत्तप्रसाद बचत गटाचे नेतृत्व सौ. अनुष्का गावकर करतात. यातून त्यांचे संघटनात्मक नेतृत्व गुण अधोरेखित होतात.

जिवन प्रवासात पती व कुटुंबाची खंबीर साथ लाभली. ग्रामस्थानीही साथ दिली. या सर्वांच्या आशीर्वादाने सामाजिक कार्य करत असताना स्वतःच्या पायावर खंबीर उभे राहू शकले. असे सांगत सौ. अनुष्का गावकर सर्वांचे आभार व्यक्त करतात.

शारदीय नवरात्रीच्या निमित्ताने या आदिशक्तीला नमन. आपल्या हातून अखंडित सेवाकार्य घडत राहो. आपल्या पुढील वाटचालीस स्काय न्यूज टुडे परिवाराकडून हार्दिक शुभेच्छा !!

ruchira top