Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

कुडाळ रेल्वे स्थानक परिसराला विमानतळाचा लूक

सुंदर रेल्वे स्थानकांमुळे पर्यटनातून विकासाला चालना मिळेल - रवींद्र चव्हाण

परिसर सुशोभीकरण कामाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते लोकार्पण

कोल्हापूर-वैभववाडीसाठी प्रयत्न करणार - खास. नारायण राणे

निलेश जोशी | कुडाळ : कोकण रेल्वे मार्गावरच्या बारा स्थानकांपैकी सिंधुदुर्गातल्या चार स्थानकांच सुशभीकरण झाले आहे. पर्यटन विकासासाठी या गोष्टी पूरक असून त्यामुळे पर्यटन विकास व्हायला मदतच होईल. फक्त हि स्थानकं सुंदर ठेवण्याचे काम रेल्वे प्रशासनासोबतच प्रत्येक प्रवाशाचे सुद्धा आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी केले. कुडाळ रेल्वे स्थानकाच्या परिसर सुशोभीकरण कामाचे लोकार्पण आज मंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. कोकण रेल्वे मार्गावरच्या १२ स्थानकांपैकी सिंधुदुर्गातील चार स्थानकांच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाले असून येत्या सहा तारखेला रायगडमधल्या दोन स्थानकांचे देखील लोकार्पण होणार असल्याचे मंत्री चव्हाण यांनी सांगितले.
कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभिकरणाचा लोकार्पण सोहळा पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. सुरुवातीला कोकण रेल्वेचे जनक कै.[[प्राध्यापक मधू दंडवते यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करण्यात आली. नन्तर फलकाचे अनावरण करण्यात आले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी खासदार नारायण राणे,माजी खासदार निलेश राणे, कोकण रेल्वे बोर्डाचे वित्त संचालक राजेश भडंग, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता मिलिंद कुलकर्णी, काका कुडाळकर, दीप्ती पडते, संजय वेंगुर्लेकर, दादा साईल, संध्या तेरसे, श्वेता शिरोडकर, बंड्या सावंत, प्राजक्ता बांदेकर, चांदणी कम्बळी, राजू राऊळ, तहसीलदार विरसिंग वसावे, सा बा. कार्यकारी अभियंता सावंतवाडी, महेंद्र किणी, आदी उपस्थित होते. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ऊपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. तसेच कुडाळ भाजपच्या वतीने नारायण राणे आणि रवींद्र चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले. रेल्वे स्थानक रिक्षा संघटनेतर्फे सुद्धा राणे आणि चव्हाण यांचे स्वागत करण्यात आले.
यावेळी बोलताना पालकमंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, आपल्या जिल्ह्याला पर्यटनाची परंपरा लाभलेली आहे. जिल्ह्यात पर्यटन वाढल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थलांतर थांबेल. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनवाढीला प्राधान्य देणार असल्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण म्हणाले. पालकमंत्री पुढे म्हणाले, मी कोकणचा भुमिपुत्र असून कोकणच्या विकासासाठी कायम झटणार आहे. मला पालकमंत्री पदाच्या निमित्ताने कोकणच्या विकासाची संधी मिळाली आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी स्थलांतर थांबणे आवश्यक आहे. रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी पर्यटनवाढीसाठी नवनवीन उपक्रम राबविणे आवश्यक आहे. कुडाळ रेल्वे स्थानकाच्या सुशोभिकरणामुळे नक्कीच पर्यटक आकर्षित होणार आहेत. जिल्ह्यातील अनेक भागात पर्यटनस्थळे विकसित करण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील आहे. मालवण येथे संग्रहालय निर्माण करण्याचा मानस आहे. मोरयाचा धोंडा हे देखील पर्यटनस्थळ व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पर्यटन वाढल्यास येथील रोजगारात वाढ होणार आहे. स्वच्छतेमध्ये देशभरात आपला जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे. जिल्ह्यातील रेल्वे स्थानक देखील स्वच्छ ठेवणे ही देखील आपली जबाबदारी असल्याचेही ते म्हणाले.
खासदार नारायण राणे म्हणाले, परीवहन व्यवस्था प्रगतीचे परीमाण आहे म्हणून पर्यटनामध्ये रेल्वे स्थानकाचे महत्व आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील अनेक रेल्वे स्थानकांचा विकास झालेला आहे. आपल्या जिल्ह्याचे दरडोई उत्पन्न वाढविण्यासाठी नवउपक्रम राबविणार आहे. जिल्ह्याच्या विकासाचा ध्यास घेतला असून सर्वांनी यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. वैभववाडी-कोल्हापूर रेल्वे मार्गासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन मागणी केल्याचे त्यांनी सांगितले.
माजी खासदार निलेश राणे म्हणाले, जिल्ह्यातील ४ रेल्वे स्थानक अगदी विमानतळावर असल्याचा भास निर्माण करतात एवढी ती स्थानके देखणी झालेली आहेत. पालकमंत्री यांनी कमी कालावधीत या स्थानकांचे सुशोभिकरण करुन जनतेला दिलेला शब्द खरा केला असल्याचेही ते म्हणाले. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाकडे देखील कोकण रेल्वेने लक्ष द्यावे अस्थी मागणी निलेश राणे यांनी यावेळी केली. यावेळी कोकण रेल्वेचे वित्तीय संचालक राजेंद्र भडंग यांनी देखील आपलं मनोगत व्यक्त केलं.
९ कोटी ६० लाख खर्चून कुडाळच्या या रेल्वे स्थानकाला विमानतळाचा लूक आला असून या रेल्वस्थानकात पार्किंगची देखील प्रशस्त व्यवस्था करण्यात आलेली आहे. यामध्ये ६० रिक्षा, ७० चारचाकी आणि १०० दुचाकी सहजपणे पार्क केल्या जाऊ शकतात. तसेच दिव्यांगांसाठी सुद्धा स्वतंत्र व्यवस्था करण्यात आलेली आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन निलेश पवार यांनी केले तर आभार प्रभाकर सावंत यांनी मानले.

ruchira top