Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

कुडाळ मध्ये 'लाख मोलाची, निष्ठेची दहीहंडी'

ठाकरे गट, युवा सेनेच्या वतीने आयोजन

युवा सेना उपजिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांची माहिती

कुडाळ : आमदार वैभव नाईक पुरस्कृत शिवसेना ठाकरे गट युवा सेना यांच्या वतीने 27 ऑगस्ट रोजी कुडाळ जिजामाता चौक येथे दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. लाख मोलाची निष्ठेची दहीहंडी असे या दहीहंडीला ओळखले जाणार असून या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती युवा सेना उपजिल्हा प्रमुख मंदार शिरसाट यांनी दिली. कुडाळ येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.


मंदार शिरसाट म्हणाले, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कुडाळ तालुका व कुडाळ मालवण मतदार संघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार वैभव नाईक पुरस्कृत ही मानाची लाख मोलाची निष्ठेची दही हंडी असून त्याचे बक्षिस १ लाख रुपये आहे. दि. 27 ऑगस्टला जिजामाता चौक येथे संध्याकाळी ठीक 5.00 वाजता मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन होऊन या उत्सवाचा शुभारंभ होणार आहे. या निमित्ताने संध्या ६ वाजल्यापासून द रॉकरर्स बॉलीवूड बॅंडचा आर्केट्रा,महिलांसाठी खास कार्यक्रम, असे सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत.


या दहीहंडी उत्सवात नामांकित गोविंदा पथके सहभागी होणार असून सहभागी संघास २५०० रुपये देण्यात येतील. तसेच ४ थर लावणाऱ्या पथकाला ४ हजार , ५ थरसाठी ५ हजार, ६ थरासाठी ६ हजार , ७ थरासाठी ७ हजार , ८ थरासाठी ८ हजार अशी पारितोषिके आहेत. अधिक माहितीसाठी गोट्या चव्हाण (९६७३०११८७६), गुरु गडकर (९५२७२६२४२८), अमित राणे (९१५८१५५८८९) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
यावेळी मंदार शिरसाट यांच्यासह उदय मांजरेकर, संतोष शिरसाट, गोट्या चव्हाण, संदीप म्हाडेश्वर, आदी उपस्थित होते.

ruchira top