महाराष्ट्र नाभिक महामंडळ सिंधुदुर्ग, कुडाळ यांचे आयोजन
गणेश चव्हाण | कुडाळ : महाराष्ट्र नाभिक महामंडळ सिंधुदुर्ग, कुडाळ तालुक्याच्या वतीने कुडाळ पावशी येथे, उमाजी चव्हाण यांच्या निवासस्थानी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कुडाळ तालुक्यासह जिल्ह्यातील रक्तदात्यांनी उपस्थित राहून रक्तदान करावे, असे आव्हान नाभिक संघटना कुडाळ तालुकाध्यक्ष भिवा चव्हाण यांनी केले आहे.
नाभिक संघटना कुडाळ तालुक्याच्या वतीने दरवर्षी नाभिक बांधवांसह समाजासाठी शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध उपक्रमांचे आयोजन करत असतात. ३० ऑगस्ट रोजी हे रक्तदान शिबिर होणार आहे.
श्री संत सेना महाराजांचे प्रतिमा पूजन व विविध धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा आणि कर्तुत्ववान भाविक बांधवांचा योग्य सन्मान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला नाभिक बांधवांनी व सिंधुदुर्गातील रक्तदात्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन नाभिक संघटना कुडाळ तालुका अध्यक्ष भिवा चव्हाण यांनी केले आहे.

