Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

नाभिक संघटनेच्या वतीने कुडाळ येथे सौंदर्यकला प्रशिक्षण व प्रदर्शन शिबीर

महाराष्ट्र नाभिक महामंडळ सिंधुदुर्ग सलून ब्युटी पार्लर असोसिएशन महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजन

गणेश चव्हाण | सिंधुदुर्ग : महाराष्ट्र नाभिक महामंडळ, सिंधुदुर्ग व महाराष्ट्र सलुन ब्युटी पार्लर असोसिएशनच्या वतीने, सिंधुदुर्गात आधुनिक पध्दतीचे मेकअप व केश कर्तनाचे प्रशिक्षण व प्रदर्शन शिबीर, ३१ ऑगस्ट रोजी शांतादुर्ग हाॅल पावशी कुडाळ येथे आयोजित केले आहे. याचा सर्व नाभिक बांधवांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अध्यक्ष जगदिश चव्हाण यांनी केले आहे.

महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे संघटक विजय चव्हाण व सरचिटणीस राजन पवार यांच्या शिस्तबद्ध मार्गदर्शनाखाली ३१ ऑगस्ट रोजी सकाळी ९ ते ५ या वेळेत हे शिबीर, महाराष्ट्र सलुन ब्युटी पार्लर असोशिएशनचे अध्यक्ष सुप्रसिध्द मेक्-अप आर्टिस्ट प्रसाद दत्तात्रय चव्हाण, सुप्रसिद्ध हेअर स्टायलीस्ट मुंबई जिल्हा अध्यक्ष तुषार चव्हाण व अन्य केश कर्तनमधील नामवंत शिक्षक मार्गदर्शन करणार आहेत. तसेच वेगवेगळ्या मोठ्या सलुन सामान कंपन्यांचे स्टाॅल मांडण्यात येणार आहेत.

मालवण येथील नाभिक संघटणेत मार्गदर्शन करतांना अध्यक्ष जगदिश चव्हाण, व इतर मान्यवर

महाराष्ट्र सलुन ब्युटी पार्लर असोशिएशनचे अध्यक्ष सुप्रसिध्द मेकअप आर्टिस्ट प्रसाद चव्हाण या शिबिरामध्ये मेकअपबाबत आणि मुंबई जिल्हा सलुन असो. अध्यक्ष सुप्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट तुषार चव्हाण हे वेगवेगळे हेअर कट व स्टाईल तसेच सलुन सामान याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

तरी जास्तीत जास्त नाभिक बांधवांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन सलून ब्युटी पार्लर असोशिएशनचे सिंधुदुर्ग प्रमुख चंद्रशेखर सावंत आणि सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्र नाभिक मंडळ अध्यक्ष जगदीश चव्हाण आणि कुडाळ तालुका अध्यक्ष भिवा चव्हाण यांनी केले आहे.

ruchira top