मालवण शिवसेना पदाधिकाऱ्यांचे नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन
मालवण : मालवण नगरपालिका हद्दीतील काही रस्त्याची बिकट अवस्था झाली आहे. या रस्ता दुरुस्ती साठी मालवण शिवसेना मालवण शहरप्रमुख बाळू नाटेकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे. नगरपालिका हद्दीतील रस्ता गेल्या चार-पाच महिन्यापूर्वी डांबरीकरण करण्यात आला होता. ते काम योग्य न झाल्यामुळे रस्ता उखडून संपूर्ण रस्त्यावर खडी वर आलेली आहे.
रस्त्यावर आलेल्या खडीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. ते खड्डे सिमेंट काँक्रिटने बुजविण्यात यावेत. गणेश चतुर्थीचा सण काही दिवसांवर आहे गणपतीच्या आगमनासाठी गणेश मूर्ती घरोघरी घेऊन जाताना समस्या निर्माण होणार आहेत. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडी झुडपे वाढलेली आहेत, ती तोड काम करून घेणे. अशा आशयाचे निवेदन नगरपालिका मुख्याधिकारी यांना शिवसेना मालवण शहरप्रमुख बाळू नाटेकर, उपजिल्हाप्रमुख विश्वास गावकर, उपतालुकाप्रमुख अरुण तोडणकर, कुंभारमाठ, उपविभाग प्रमुख दीपक मिठबांवकर यांच्या वतीने देण्यात आले.

