Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

इंग्रजी शाळांची बदललेली वेळ बदलण्याबाबत वाढती मागणी

इंग्रजी शाळांची बदललेली वेळ बदलण्याबाबत वाढती मागणी

मालवण येथील सौ. शिल्पा यतीन खोत यांनीही मांडली भुमिका

मालवण : इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वेळ सकाळी ९ ते दुपारी २. ४५ अशी बदलण्यात आल्याने मुलांच्या आरोग्यावर व मानसिकतेवर परिणाम होत आहे. यामध्ये मुलांबरोबरच पालकांचीही ओढाताण होत आहे. त्यामुळे शाळांची वेळ बदलून ९ ते २ अशी करण्यात यावी, अशी मागणी मालवण मधील रोझरी इंग्लिश स्कुलच्या पालकांनी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली आहे.


इंग्रजी शाळेची वेळ बदलण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातून सकाळी ८ वाजता बाहेर पडणाऱ्या मुलांना शाळा आटोपून घरी पोहचण्यास सायंकाळी ४ ते ४.३० वाजतात. मुलांनी सकाळी डब्यातून आणलेले जेवण दुपारपर्यंत थंड होत असल्याने मुले नीट जेवत नाहीत. जेवणाची वेळ बदलल्याने त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. काही लांब राहणाऱ्या पालकांना व नोकरदार पालकांना मुलांची ने - आण करताना धावपळ होत आहे. तसेच बदललेल्या वेळेमुळे मुलांना इतर स्पर्धा परीक्षाचे शिकवणी वर्ग, नृत्य, कराटे आदी क्लासला जाताना ओढताण होत आहे. देवबाग, चौके, आचरा अशी लांबून मालवणात येणारी मुलेही आहेत. मालवण तालुका हा पर्यटन तालुका असल्याने पर्यटन हंगामात शाळेच्या बदललेल्या वेळेमुळे मुलांना घरी पोहचण्यास आणखी वेळ लागणार आहे. या सर्व अडचणी लक्षात घेऊन शाळेची वेळ बदलून सकाळी ९ ते दुपारी १.३० किंवा ९ ते दुपारी २ अशी करावी, अशी मागणी पालकांनी शिक्षणमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.


दरम्यान इंग्रजी शाळांच्या बदललेल्या वेळेमुळे विद्यार्थी व पालकांना होणाऱ्या त्रासाबाबत ठाकरे शिवसेनेच्या मालवण कुडाळ युवतीसेना प्रमुख शिल्पा खोत यांनीही लक्ष वेधले आहे. शाळेची वेळ बदलल्यामुळे भेडसावणाऱ्या अडचणी बाबत गेला महिनाभर पालकांनी शिक्षणाधिकाऱ्यांकडे विनवणी करूनही अद्यापपर्यंत त्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही. इंग्रजी शाळांच्या वेळ बदलण्याबाबत जिल्हाभरातून मागणी होत असताना जिल्ह्यातीलच शिक्षणमंत्री असलेल्या दीपक केसरकर यांना लक्ष देण्यास वेळ नाही. पालकांच्या या अडचणींची त्वरित दखल घेऊन याप्रश्नी मार्ग काढण्यात यावा, असे सौ. खोत यांनी म्हटले आहे.

ruchira top