आर्थिक मदत संपूर्द : मुख्यमंत्री सहायता निधीतूनही मदतीची ग्वाही
मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील आचरा समुद्रात मासेमारी नौका दुर्घटनेत सर्जेकोट येथील गंगाराम उर्फ जीजी आडकर व हडी येथील लक्ष्मण सुर्वे, प्रसाद सुर्वे यांचा मृत्यू झाला.
दरम्यान, मालवण हडी दौऱ्यावर असताना शिवसेना मालवण कुडाळ पक्ष निरीक्षक दीपक वेतकर, बाळा चिंदरकर यांनी सुर्वे कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. आर्थिक मदतीचा हात देत मुख्यमंत्री सहायता निधीतून ही मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आंग्रे, कुडाळ मालवण विधानसभा प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, युवानेते प्रितम गावडे यांसह अन्य पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

