भाजपा नेते निलेश राणे पुरस्कृत आणि पर्यटन व्यवसाय महासंघ आयोजित स्पर्धा
मालवण | प्रतिनिधी : नारळी पौर्णिमेनिमित्त भाजपा नेते निलेश राणे पुरस्कृत आणि पर्यटन व्यवसाय महासंघ आयोजित रिक्षा सजावट स्पर्धा संपन्न झाली. स्पर्धेस उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभला. पारंपरिक साज करून सजावण्यात आलेल्या रिक्षा व बाजारपेठ मार्गे निघालेली रॅली आकर्षण ठरली.
स्पर्धेत प्रथम क्रमांक वरद धुरी यांनी 15,000 रुपये, द्वितीय क्रमांक खडपकर यांना 10,000 रुपये, तृतीय क्रमांक गणेश लुडबे यांना 5,000 रुपये देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच उत्तेजनार्थ स्पर्धक दिनेश किडये, सुभाष मांजरेकर, विठोबा वांयगणकर, जॉनी मेंडीस, राजू डींगणकर, राजा मांजरेकर यांना सन्मानित करण्यात आले.

स्पर्धेचे उदघाटन निलेश राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी पर्यटन महासंघ अध्यक्ष बाबा मोंडकर, तारकर्ली पर्यटन विकास संस्था अध्यक्ष सहदेव साळगावकर, रवींद्र खानविलकर, उद्योजक केदार झाड, देवानंद लोकेगावकर, दर्शन वेंगुर्लेकर यांसह भाजपा पदाधिकारी जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब, महेश मांजरेकर, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, पंकज सादये, आप्पा लुडबे, संचालक आबा हडकर, मोहन वराडकर, किशोर खानोलकर, शिवसेना माजी सचिव किसन मांजरेकर, माजी उपसभापती राजु परुळेकर, राजु बिडये, भाई मांजरेकर, बंड्या पराडकर, राकेश सावंत, मंदार लुडबे, अभी लाड, ललित चव्हाण, निषय पालेकर, जॉमी ब्रिटो, ओम तोडणकर, संदीप भोजने, यांसह भाजपा महिला तालुकाध्यक्ष पुजा करलकर, शहर अध्यक्षा चारू आचरेकर, अध्यक्षा राणी पराडकर, वैष्णवी मोंडकर, माजी नगरसेविका शर्वरी पाटकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, पूजा सरकारे, ओबीसी मोर्चा तालुकाध्यक्ष पुजा वेरलकर, तारका चव्हाण, तुलसी चव्हाण, महिमा मयेकर, अमिता निव्हेकर, दिव्या कोचरेकर उपस्थित होते.

यांसह पर्यटन व्यावसायिक, भाजपा, शिवसेना कुडाळ मालवण प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख राजा गांवकर, माजी सचिव किसन मांजरेकर, युवसेना जिल्हप्रमुख ऋत्विक सामंत, युवती सेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, रिक्षा प्रतिनिधी पप्या कद्रेकर, निलेश लुडबे, धनेश हडकर, हेमंत कांदळकर, मनोज धुरी आदी उपस्थित होते.

