लहान गटातून आरव विलणकर तर मोठ्या गटातून सुजाना फर्नाडीस प्रथम
मालवण : नारळी पौर्णिमेनिमित्त मालवण व्यापारी संघ आयोजित पारंपरिक वेशभूषा स्पर्धा संपन्न झाली. यामध्ये बालवाडी ते इयत्ता तिसरी गट प्रथम क्रमांक आरव सचिन विलणकर याला 1000 रुपये, द्वितीय क्रमांक अन्विला गौरव ओरसकर हिला 700 रुपये, तृतीय क्रमांक अथर्व बांदिवडेकर याला 500 रुपये, तर उत्तेजनार्थ क्रमांक तनिष चव्हाण व सहारा पवार ह्यांना 300 रुपये व सर्व विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
इयत्ता चौथी ते सातवी गटातून प्रथम क्रमांक सुजाना फर्नाडीस हिला 1500 रुपये, द्वितीय क्रमांक अन्विका नेवगी हिला 1200 रुपये, तृतीय क्रमांक मनवा पराडकर हिला 800 रुपये, तर उत्तेजनार्थ क्रमांक वेदा बिळवसकर आणि खुशी सावंत ह्यांना 500 रुपये व सर्वांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
यावेळी मालवण व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर, तालुकाध्यक्ष प्रमोद ओरोसकर, जिल्हा कार्यवाह नितीन वाळके, माजी जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, रवी तळाशिलकर, विजय केनवडेकर, गणेश प्रभुलकर, बाळू अंधारी, हर्षल बांदेकर, सुहास ओरोसकर, अभय कदम, गार्गी ओरोसकर व व्यापारी बांधव, भगिनी, पालक आदी उपस्थित होते.

