सौरव भोगले उपविजेता ; अनंत पाटकर मित्र मंडळ यांचे आयोजन
भाऊ भोगले | बागायत : उ.बा.ठा. शिवसेना शाखा वडाचापाट आणि अनंत पाटकर मित्र मंडळ आयोजित नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन मसदे तिठा येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत विजेता ठरलेल्या प्रतिक शिंदेला रोख 3500 रुपयाचे बक्षीस चषक आणि मेडल उद्योजक सतीश नाईक, कणकवली यांच्या हस्ते देण्यात आले, तर उपविजेता ठरलेल्या सौरव भोगले याला रोख 1500 रुपये , चषक आणि ट्रॉफी व मेडल पराग नार्वेकर यांच्या हस्ते देण्यात आले.

या स्पर्धेचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे सर्व सहभाग घेतलेल्या स्पर्धकांना मेडल प्रधान करण्यात आले होते. या स्पर्धेला माजी जि. प. अध्यक्ष संग्राम प्रभूगावकर ,मसुरे गावचे उपसरपंच राजेश गावकर , प्रसिद्ध उद्योजक सचिन आचरेकर, अमित भोगले, राहुल सावंत ,आयवान फर्नांडिस व्यासपीठावर उपस्थित होते. तसेच अनंत पाटकर मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित सर्वांचे अनंत पाटकर यांनी आभार मानले.


