Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

कोळंब सरपंचांच्या अकार्यक्षम कारभारामुळे स्मशानभूमीची दुरुस्ती रखडली

ग्रामस्थांसह उपसरपंच व सदस्यही संतप्त

गावात घरोघरी फिरून…..

मालवण : कोळंब-सर्जेकोट या दोन गावांसाठी असलेल्या स्मशानभुमीची शेड पावसात नादुरूस्त होऊन कोसळली. मात्र यांच्या दुरूस्तीसाठी कार्यवाही होत नसल्याने दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. कोळंब सरपंच यांच्या आकार्यक्षम कारभारामुळे ही परिस्थिती उद्भभवली आहे. असे सांगत ग्रामस्थ तसेच उपसरपंच व सदस्य आक्रमक बनले.

स्मशानभूमीच्या कोसळलेल्या शेडची दुरूस्ती होत नसेल तर लोकवर्गणी काढून सदरच्या शेडची दुरूस्ती अगर नव्याने बांधणी करण्यात येईल, असा इशारा कोळंब गावचे गाव अध्यक्ष संदीप शेलटकर यांनी दिला आहे.

सर्जेकोट ग्रामपंचायतीकडून याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येत असताना कोळंब ग्रामपंचायत सरपंच सिया धुरी यांच्याकडून कोणत्याही प्रकारे योग्य ती कार्यवाही होत नसल्याबद्दल तसेच उपसरपंच यांच्याबद्द्लही ग्रामस्थ यांनी नाराजी व्यक्त केली.

सर्जेकोट येथील शेलटकर निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत शेलटकर बोलत होते. यावेळी कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर, सर्जेकोट ग्रामपंचायत सदस्या भारती आडकर, निखील नेमळेकर, विनायक कोळंबकर, संतोष शेलटकर, प्रसाद पाटील, सदानंद कांदळगावकर, शुभम परब, अभिजीत आडकर, कोळंब ग्रामपंचायत सदस्या संपदा प्रभू संजना शेलटकर, गोविंद सावजी, चिन्मय शेलटकर, यश कोयंडे, गणेश कांदळगावकर, यश शेलटकर, कामेश शेलटकर, दुर्गेश टिकम आदी उपस्थित होते.

यावेळी दोन्ही गावच्या ग्रामस्थांनी स्मशानशेडची दुरूस्ती अगर नव्याने उभारणी करण्यासाठी एकसंघपणे काम करण्याचा निर्णय घेतला. तसेच शासन स्तरावर पाठपुरावा करण्यासाठी एक समिती गठीत करून काम करण्याचेही ठरविण्यात आले.

स्मशानभूमीचे कोसळलेले साहित्य परिसरात कोसळून पडलेले आहेत. लोखंडी शेडचे काही खांब धोकादायल स्थितीत उभे असल्याने त्याठिकाणी अंत्यसंस्कार करणे कठीण झाले आहे. स्मशानभूमीमध्ये लाकडे नेण्यासाठी दोन्ही गावातील लोकांनी कसरत करावी लागली. आडकर सर यांच्या अंत्यसंस्कारप्रसंगी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात हितचिंतक आणि मित्रपरिवार आलेले असताना त्यांच्याकडून स्मशानभूमीच्या अवस्थेबाबत तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात आली. त्याठिकाणी जाणारा रस्ताही खुला नसल्याने ही परिस्थिती निर्माण झाली होती. दोन्ही गावच्या ग्रामस्थांनीही आता स्मशानशेडसाठी प्रत्येक घरात फिरून मदत उभी करण्याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे, असेही श्री. शेलटकर म्हणाले.

स्मशानशेडच्या दुरूस्तीसाठी किमान तीन लाख रूपयांच्या निधीची आवश्यकता होती. सर्जेकोट ग्रामपंचायत यासाठी सहकार्य करण्यासाठी पुढे आले होते, मात्र कोळंब ग्राममपंचायतीकडून कामे करणाऱ्या ठेकेदारांना त्रास देण्यात येत असल्याने ठेकेदार कोणीही पुढे येत नसल्याने सदरचे काम अडकून पडले आहे. असा आरोप करण्यात आला. गावातील काही कामांमध्ये ठेकेदारांना त्रास झाल्याने त्यांच्याकडून कोळंब गावातील कामे करण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. सध्या स्मशानशेडच्या पडझड झालेल्या साहित्यामुळे त्याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यास त्रास होत आहे. यामुळे तातडीने कार्यवाही व्हावी. शेड उभारणी आरसीसीमध्ये करणे आवश्यक आहे. म्हणजे ती जास्त काळ टिकेल. यासाठी आम्ही आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार असतानाही सरपंच यांच्याकडून सहकार्य मिळत नसल्याबद्दल कोळंब उपसरपंच विजय नेमळेकर यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

स्मशानभूमीसाठी सरपंचांना वेळ नाही

कोळंब सरपंच सिया धुरी या संपूर्ण गावातून निवडून आलेल्या आहेत. त्यांना स्मशानभूमीच्या दुरूस्तीसाठी तातडीने कार्यवाही करण्यासाठी वेळ मिळत नाही. जर तातडीने कार्यवाही होवून सर्जेकोट ग्रामपंचायतीकडूनही निधीची उपलब्धता केली असती तर सदरचे काम पूर्ण झाले असते, मात्र सरपंच यांच्याकडून कार्यवाही होत नसल्याने आज सदरची शेड अपूर्ण राहिलेली आहे. सरपंच यांच्या विरोधात ज्यांनी शासनाकडे तक्रार केली त्यांचाच सत्कार करण्यासाठी त्यांना वेळ आहे. मालवणातील कार्यक्रमांना सहभागी होण्यासाठी त्या जात असतात, मात्र दोन गावांसाठी महत्वपूर्ण असलेल्या स्मशानशेडसाठी त्यांना वेळ मिळत नसल्याबद्दल शेलटकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.

कॉम्प्लेक्सला जलदगतीने परवानगी

कोळंब परिसरात सुमारे १२८ निवासी सदनिकांचे कॉम्प्लेक्स उभारले जात - असल्याने त्यांना कोळंब ग्रामपंचायतीमध्ये सरपंच यांनी पुढाकार घेऊन तातडीने - परवानगी दिली आहे. यासाठी संबंधित व्यक्तीला ग्रामपंचयातीच्या मासिक सभेतही - प्रवेश देण्यात आलेला होता. परिसरात पाणी प्रश्न असताना कॉम्प्लेक्सला लागणारे पाणी उपलब्ध होणार कुठून? त्यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे हाल होणार - असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून सरपंच यांनी यासाठी पुढाकार घेतला होता, मात्र स्मशानभूमीसाठी पुढाकार घेण्यात आला नाही, असेही श्री. नेमळेकर यावेळी म्हणाले.

ruchira top