Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

सावंतसाहेब, राजन तेलींबाबत आम्ही संयम बाळगलाच !



चव्हाण-कदम प्रकरणात आपला संयम सांभाळा

शिवसेना प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी प्रभाकर सावंत करुन दिली महायुतीच्या धर्माची जाणीव

कुडाळ : मंत्री रवींद्र चव्हाण आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यातील शाब्दिक वादावर भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर चव्हाण यांनी वक्तव्य केले आहे. त्याला शिवसेना जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी यांनी उत्तर देताना मंत्री दीपक केसरकर यांच्याबाबत राजन तेली करीत असलेल्या वक्तव्याची त्यांना आठवण करून दिली आहे. त्यावेळी आम्ही महायुतीचा धर्म म्हणून संयम पाळला आहे, याची आठवण श्री. जोशी यांनी प्रभाकर सावंत यांना करून दिली आहे.
यायबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रत्नाकर जोशी म्हणतात, महाराष्ट्रात महायुतीचे सरकार कार्यरत असून गेल्या अडीच वर्षात क्रांतिकारी निर्णय घेणारे सरकार म्हणून ते कार्यरत आहे. या सरकारची आपणा सर्वांनाच किती गरज आहे हे त्यापूर्वीच्या अडीज वर्षात आपण सर्वानी अनुभवले आहे.  गेली कित्येक वर्ष मुंबई गोवा हायवेचा प्रश्न प्रलंबित असून जनता त्यावरून संतप्त आहे. अशावेळी जनतेचे प्रश्न मांडत शिवसेना नेते रामदास भाई कदम यांनी जनतेची व्यथा आणि खंत व्यक्त केली.
    सदर हायवेचे काम हे गणेश चतुर्थीपूर्वी  एक साईडने तरी पूर्ण करु असे वचन मागील वर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय रवींद्र  चव्हाण साहेब यांनी दिले होते. परंतु भौगोलिक परिस्थिती म्हणा किंवा तांत्रिक बाबीमुळे मार्ग पूर्ण होऊ शकलेला नाही. आपल्या आक्रमक स्वभावाप्रमाणे रामदास कदम यांनी जनतेची दुःखे व्यक्त केली, त्यावर क्रियेला प्रतिक्रिया म्हणून रवींद्र चव्हाणदेखील आपल्या शैलीमध्ये उतरले आहेत. दोन्ही वरिष्ठ नेते आपापल्या पक्षातील महत्त्वाचे नेते असून महायुतीत त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे, असे शिवसेना सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते रत्नाकर जोशी म्हणाले आहेत.
     कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी वरिष्ठ पातळीवर याची चर्चा करून भविष्यात असे पुन्हा होऊ नये म्हणून प्रयत्न होतीलच.  मात्र या विषयावर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सन्माननीय प्रभाकर सावंत यांनी दखल घेत माफीनाम्याची भाषा करणे संयुक्तिक वाटत नाही. प्रभाकर सावंत आमचे सहकारी असून संयमी नेतृत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. सावंतवाडी विधानसभा मतदार संघात भाजपा नेते राजन तेली महायुतीचा धर्म तोडून शिवसेना नेते दीपक केसरकर यांच्यावर वारंवार टीका करत असूनही जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी आपला संयम कधीही ढळू दिलेला नाही. आताही त्याच संयमाने हा विषय न ताणता महायुती म्हणून तो थांबणे महत्त्वाचे आहे. कारण अशी वक्तव्ये म्हणजे विरोधकांना युती तोडण्याची संधी देणे होईल, तसे झाल्यास महायुतीला नक्कीच नुकसान सोसावे लागणार आहे. आम्हाला शिवसेना म्हणून आमच्या ताकदीची पूर्ण खात्री आहे, पण यात नुकसान दोघांचेही आहे.
    स्थानिक नेते म्हणून भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक नेत्यांचा कार्यकर्त्यांचा आम्ही शिवसैनिक म्हणून नेहमीच मानसन्मान ठेवला आणि ठेवत आहोत. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या क्रांतिकारक उठावामुळेच महाराष्ट्र राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार बाजूला करून महायुतीची सत्ता आणण्यात यश आलेलं आहे. सदरचे यश आगामी विधानसभेमध्ये सुद्धा आपणाला महायुतीची सत्ता आणून हे यश टिकवणे महत्त्वाचे आहे लोकसभेच्या निवडणुकीत निकाल पाहता विधानसभेला महायुती एकत्रित असणे फार आवश्यक आहे. अन्यथा विरोधकांना संधी दिल्यासारखे होईल.
    सावंतसाहेबांना माझी विनंती राहील, आपण आपला नेहमीचा संयम अबाधित राखावा. महायुतीसाठी आपले एवढे योगदान पुरेसे होईल, असा सल्लाही रत्नाकर जोशी यांनी प्रभाकर सावंत यांना दिला आहे.

ruchira top