Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

कोकणात महायुती टिकवायची असेल तर रामदास कदमांनी माफी मागावी- प्रभाकर सावंत

सिंधुदुर्ग : युतीतील घटक पक्ष असलेल्या सेनेच्या रामदास कदमांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याबद्दल काढलेल्या गैरउदगारसाठी माफी मागावी अन्यथा जिल्ह्यात महायुती बाबत विचार करावा लागेल. अशी रोखठोक भुमिका भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी स्पष्ट केली आहे.

पालकमंत्री यांनी संपूर्ण कोकणात महायुतीसाठी मोठं काम उभे केलेले आहे, बांधकाम मंत्री झाल्यापासून रत्नागिरी सिंधुदुर्ग साठी विधायक कामे केलेली आहेत,असे असताना स्वतःच्या मंत्रिपदाच्या कालावधीत कोकणासाठी काहीच काम न करणाऱ्या व्यक्तीने कार्यतत्पर लोकानेत्याबाबत असे विधान करणे अत्यंत निंदाजनक आहे.

सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची मोठी ताकद आहे.जर युतीतील जबाबदार नेत्यामार्फत समोरून असे वागणे वारंवार होत असेल आणि त्या पक्षाचे वरिष्ठ जर त्याला आवर घालणार नसतील तर युतीसाठी आमचा कोणीही कार्यकर्ता तयार असणार नाही. आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या वादाला आणि समोरच्या पक्षाच्या नुकसानीला तीच मंडळी जबाबदार राहणार आहेत.

आज या वादग्रस्त व्यक्तव्यामुळे जिल्ह्यातील तमाम भाजपा कार्यकर्त्यांच्या मनात चीड निर्माण झालेली आहे याची नोंद संबंधितांनी घ्यावी आणि रामदास कदम यांना माफी मागायला लावावी.

या जिल्ह्यात मनात आणले तर भाजपा तीनही जागा स्वबळावर जिंकू शकतो हे त्रिकालाबाधित सत्य आहे. त्याची कल्पना युतीतील इथल्या स्थानिक नेत्यांना आहे. त्यामुळे या विषयावर सेनेच्या वरिष्ठांनी गंभीरपणे विचार करावा. जोपर्यंत माफीनामा येत नाही तोपर्यंत महायुतीच्या कोणत्याही समन्वय बैठकीला आमचं सहकार्य असणार नाही. असे प्रभाकर सावंत म्हणाले.

ruchira top