Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

भाजप-ठाकरे शिवसेना कार्यकर्ते आमने सामने !


नारळी पौर्णिमा मिरवणुकी दरम्यान वादंग


कुडाळ : नारळी पौर्णिमेनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत भाजप आणि ठाकरे गट दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि वादंग निर्मण झाला. त्यामुळे काही काळ कुडाळ शहरात वातावरण तणावपूर्व बनले होते.

अखेर पोलिसांनी हस्तक्षेप केल्यावर दोन्ही मिरवणुका मार्गस्थ झाल्या असल्या तरी पुन्हा एकदा काळप नाक्यावर तणावपूर्ण  परिस्थिती निर्माण झाली होती. 

नारळीपौर्णिमेनिमित्त आज संध्याकाळी कुडाळ शहरात भाजप आणि उद्धव ठाकरे शिवसेनेकडून वेगवेगळ्या रॅलींचे आयोजन करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या रॅलीला तीन वाजतानाचा वेळ दिला होता तर ठाकरेगटाच्या रिक्षा रॅलीला दोन तासांची वेळ देण्यात आली होती. पण दोन्ही रॅली साधारण एकाच वेळी सुरु झाल्या. ठाकरे शिवसेना कार्यालयाकडे दोन्ही पक्षांच्या रॅली येताच वाहतुकीची कोंडी झाली. यादरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी फटाके लावून जल्लोष केला. याचवेळी भाजप आणि ठाकरे शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यावेळी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली. दोन्ही बाजूचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर  जाण्याचा प्रयत्न झाला. या दरम्यान  कोणतीही अनुचित घटना घडू नये म्हणून कुडाळ पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांना आवरले.

ruchira top