एकता मित्र मंडळ आणि ग्लोबल रक्तदाते मालवण यांचे आयोजन
दिपिका देऊलकर | मालवण : एकता मित्र मंडळ आणि ग्लोबल रक्तदाते यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. देसाई बिल्डिंग कासार व्हाळी, सोमवार पेठ मालवण येथे हे रक्तदान शिबिर संपन्न होणार आहे.

एकता मित्र मंडळ आणि ग्लोबल रक्तदाते यांच्या संयुक्त विद्यमानाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी सकाळी 9 ते 2 या वेळेत हे रक्तदान शिबिर पार पडणार आहे. हे रक्त ओरोस ब्लड बँकेत जमा केले जाणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करून इतरांच्या आयुष्यात जीवनदायी क्षण निर्माण करण्यासाठी उपस्थित रहावे, असे आवाहन एकता मित्र मंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी अमोल देसाई- 9404535273, नेहा कोळंबकर- 9404920366, जितेंद्र हिरलोस्कर - 9764109757 यांच्याशी संपर्क साधावा.

