Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

संतवाड्मय रुचेल अशा पद्धतीने सांगण्याची गरज ;डाॅ. सौ. स्वाती शिरडकर

दासबोध सखोल अभ्यास फाऊंडेशन, कोअर कमिटी सदस्यांची बैठक संपन्न

वैभववाडी | प्रतिनिधी : विश्ववंदिता भारताच्या निर्माणासाठी संतांचे वाङ्ममय हे अत्यंत प्रभावी असून ते आजच्या तरूणाईला समजेल, रूचेल अशा पद्धतीने सांगण्याची गरज आहे असे प्रतिपादन श्री.रामचंद्र वैद्यकीय विज्ञान संस्थेच्या अधिष्ठाता डाॅ. सौ.स्वाती शिरडकर यांनी केले.दासबोध सखोल अभ्यास फाऊंडेशनच्या कोअर कमिटीतील सदस्यांची बैठक समर्थ सदन, छत्रपती संभाजी नगर येथे दि.१७ व १८ ऑगस्ट रोजी संपन्न झाली. या बैठकीत मार्गदर्शन करतांना डाॅ . शिरडकर बोलत होत्या.


संताचे साहित्य आणि आधुनिक विज्ञानातील अनेक संदर्भ देऊन त्यांनी आजच्या तरुण पिढीला योग्य दिशा देण्याची गरज विशद केली.
दासबोध सखोल अभ्यास हा उपक्रम चाळीस वर्षांपासून कार्यरत असून देशातील नऊ राज्ये व जगातील सहा देशांमध्ये साधक अभ्यास करीत आहेत, ही गौरवाची बाब असल्याचे प्रशंसोद्गार सौ. स्वाती शिरडकर यांनी यावेळी काढले.


दा.स.अ. फाऊंडेशनचे कार्य अजून व्यापक व्हावे, या उद्देशाने या उपक्रमाचे संचालक डाॅ. विजय लाड यांनी या कोअर कमिटीचे नियोजन केले असून प्रचार, प्रसार, ग्रंथ छपाई व प्रकाशन, निधी संकलन व विनियोग, अभ्यार्थींची प्रवेश प्रक्रिया आणि उपक्रमाचे डिजिटलायजेशन तसेच संकेत स्थळाचे लोकार्पण यासाठी देशातील बारा ज्येष्ठ कार्यकर्त्यांची निवड करण्यात आली आहे.
सौ. विनया विद्वांस, विनायक विद्वांस , सौ. वृंदा व आनंद जोगळेकर, सौ.अपर्णा वांगीकर, सौ. शुभदा व विवेक थिटे (पुणे), सौ. रंजना पाटील (बेळगाव), सौ. मेधा कुळकर्णी (धाराशिव), अनिल वाकणकर (वडोदरा), संतोष सप्रे (मुंबई), सौ. माधवी पानसे (नांदेड) या सर्व सदस्यांनी दा.स.अ. कोअर कमिटीच्या पहिल्या बैठकीत सक्रीय सहभाग घेतला.


समर्थ रामदास स्वामींचे वाङ्ममय हे मानवी जीवनातील प्रपंच व परमार्थाचा सुमधुर समन्वय साधणारे असून समाज व देशाच्या सर्वांगीण विकासासाठी या साहित्याचा संशोधक पद्धतीने सखोल व शिस्तबद्ध अभ्यास होण्यासाठी दा.स.अ. फाउंडेशन करीत असलेले कार्य अधिक व्यापक होईल, अशी अपेक्षा डाॅ. विजय लाड यांनी यावेळी व्यक्त केली.
बैठकीची सुरुवात सीमाताई रिसबुड यांचे हस्ते दा.स.अ. उपक्रमाच्या संयोजक पू. अक्कास्वामी वेलणकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन झाली ,तर समारोप कल्याणकरी प्रार्थनेने झाला.

ruchira top