Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने वृक्षारोपण

दुर्मिळ वनऔषधीसह अन्य ८५० झाडांची लागवड

जुबेर खान | मालवण : आदरणीय डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा, यांच्यावतीने पर्यावरणाचे रक्षण संवर्धनासाठी पद्मश्री सन्मानित, महाराष्ट्र भूषण डॉ. श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी, रायगडभूषण डॉ. श्री. सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठकींच्या माध्यमातून सामाजिक व पर्यावरण पुरक असे विविध उपक्रम जिल्हा, राज्य व देश पातळीवर राबविले जातात. स्वच्छता अभियान, रक्तदान शिबीर, वय, अधिवास दाखले, जेष्ठ नागरिक दाखले अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. यालाच अनुसरून गेली १५ वर्षे सिंधुदुर्ग जिल्हयामध्ये हजारो वृक्ष लागवड व संवर्धन प्रतिष्ठानतर्फे करण्यात येते व त्यांचे ५ ते ६ वर्षे संगोपन करून सरकारला हस्तांतरण करण्यात येते.

हाच संकल्प हाती घेऊन सदस्यांनी ८५० वृक्षांची लागवड केली. त्यांत सफेद सावर, सप्तरंगी, कैलासपती, लालचंदन, कापूर, लक्ष्मितरू, बहावा, आपटा, सिताअशोक, कंरजा, धुप, कडूलिंब, नाना, बेल, पाडळ, चंदन, टेटू, पुत्रांजिवी, सिमारोप, आवळा, अर्जुन, कदंबा, कांचन, जांभूळ, लिंबू, औदुंबर, नरक्या, नरवेल, हाडसांदी, अश्वगंधा, सूरपिन अशा दुर्मिळ वनऔषधी वृक्षांचा समावेश होता. सदरची झाडे कृषि विज्ञान केंद्र किर्लोस यांनी उपलब्ध करून दिली आहेत.

सदर ८५० वृक्षांची लागवड जि. प. शाळा साळेल नं. १, ता. मालवण, न्यू इंग्लिश स्कूल पेंडुर कुडाळ, श्री. माली विद्यामंदिर डोगरपाल, वेंगुर्ला शहर नगरपरिषद हद्द, श्रीबैठक सावंतवाडी सभागृह, जि.प. पु.प्रा. शाळा आडवली नं. १, आर. ए. यादव हायस्कूल आडवली, त्रिमूर्ती माध्यमिक विद्यालय, शिखंडे येथे सिंधुदुर्ग जिल्हयातील १५ श्रीबैठकीतील ९०० श्रीसदस्य सहभागी झाले.

वृक्षारोपण करून विश्वसेवा, राष्ट्रसेवा, मानव जातीची अंशिक सेवा करून सृष्टीच्या ऋणातून अंशिक मुक्तता मिळविण्यासाठी वृक्ष लागवड महत्वाची आहे. वृक्षलागवडीबरोबर त्यांचे संगोपनसुध्दा महत्वपूर्ण आहे. सिंधुदुर्ग जिल्हयातील गणपती विसर्जन दरम्यान पाण्यात टाकण्यात येणारे निर्माल्य एकत्र करून पाण्याचे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी व याचा योग्य विनिमय होण्यासाठी कंपोस्ट खत निर्मिती प्रकल्प हाती घेतलेले आहेत. जेणेकरून वृक्ष लागवड केलेल्या झाडांना त्यांचे खत घालता येईल व निर्माल्यापासून निर्मलतेकडे जाता येईल असा संदेशही डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्याकडून देण्यात आला.

ruchira top