वडाचापाट ग्रामपंचायत येथे वितरण
भाऊ भोगले | बागायत : पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण व माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून श्री देवी शांतादुर्गा हायस्कूल वडाचापाटच्या विद्यार्थ्यांना माजी सभापती श्री राजेंद्र प्रभू देसाई, सरपंच सौ सोनिया प्रभू देसाई, उपसरपंच श्री सचिन पाताडे , ग्रामपंचायत सदस्य विनोद देसाई ,विराज पाटकर, सौ मांजरेकर व प्रतिष्ठित व्यावसायिक दयानंद देसाई यांच्या हस्ते वह्या वाटप करण्यात आल्या. यावेळी ग्रा. प. सर्व सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

