विद्यार्थ्यांनी स्वतः राख्या तयार करून, केली विक्री
भाऊ भोगले : बागायत जि .प . प्राथमिक शाळा वडाचापाट येथील विद्यार्थ्यांनी शाळेमध्ये नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत राख्या बनविण्याचे नियोजन करून टाकाऊतून टिकाऊ अशा राख्या बनविल्या त्या राख्या शाळेच्या आवारात स्टॉल मांडून त्त्यांची विक्रीही केली. आणि गावातील पालक व ग्रामस्थ यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी स्टॉलवर जाऊन राख्या खरेदी केल्या व विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे कौतुक केले.

यामध्ये विद्यार्थ्यांनी घरातील तुटलेल्या माळा तसेच इतर निकामी झालेले मणी व राखी बनविण्यासाठी योग्य व आकर्षक छोट्या वस्तूंचा वापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या आकर्षक राख्या बनवत सर्वांसमोर आदर्श घालून दिला तो म्हणजे कोणत्याही वस्तूच्या कधीही असाही उपयोग होऊ शकतो याचे हे उदाहरण आहे. यावेळी प्रशालेच्या सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.


