माजी बांधकाम सभापती मंदार केणी, यतीन खोत यांची माहिती
आमदार वैभव नाईक यांचे मानले आभार
मालवण : मालवण नगरपरिषद हद्द शहार भागातील विविध विकासकामांचा भूमिपूजन शुभारंभ करण्यात आला. परुळेकर व्हाळी काँक्रिट करणे, बोर्डिंग ग्राउंड ते सायबा हॉटेल गटार काँक्रीटीकरण करणे, श्री गारुडेश्वर कडे जाणारा नवीन रस्ता तयार करणे, साळसकर स्मशानभूमी दहन शेड बांधणे,ऍड. फर्नाडीस घर ते बोर्डिंग ग्राउंड गटार तयार करणे या विकासकामांचा भूमिपूजन शुभारंभ करण्यात आला.

मालवण नगरपरिषद माजी बांधकाम सभापती मंदार केणी, माजी बांधकाम सभापती यतीन खोत, भाई कासवकर, उल्हास धुरी, प्रथमेश राऊत,चेतन खोत, संजय कासवकर, उमेश खडपकर, एकनाथ आंबेरकर, रश्मी परुळेकर, बाबी जोगी, शशी खोत, कमलाकर खोत, प्रदीप मयेकर, साई वाघ, दिलीप हडकर, विलास परुळेकर, आशिष पेडणेकर, बाळू परुळेकर, शरद धुरी, दादा शिर्सेकर, सुभाष परब, रोशन शिर्सेकर, अजित माळकर, प्रथमेश कासवकर, सिद्धार्थ परुळेकर, निलेश शेलटकर, बाबू गोवेकर, विरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.



