Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

वन्यप्राणी नुकसान भरपाईत शेतकरी उपाशी आणि भाजप कार्यकर्ते मात्र तुपाशी

कुडाळ तालुक्यासाठीची नुकसान भरपाई रक्कम भाजपच्या एकट्या कार्यकर्त्याला

शिवसेना उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांनी पुराव्यानिशी केली पोलखोल

कुडाळ : तालुक्यात सन २०२२-२३ साठी वन्यप्राण्यांकडून झालेल्या नुकसान भरपाई पोटी शासनाने साडेआठ लाख रु. निधी मंजूर केला होता. त्यातील तब्बल ३ लाख रुपयाची नुकसान भरपाई वाडोस येथील भाजप पक्षाच्या बाळकृष्ण उर्फ दादा बेळणेकर व त्यांच्या पत्नीच्या नावे देण्यात आली आहे. मात्र इतर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तुटपुंजी रक्कम देण्यात आली आहे. हा मोठा भ्रष्टाचार असून शेतकरी उपाशी आणि भाजप कार्यकर्ते मात्र तुपाशी असाच प्रकार असल्याचा आरोप ठाकरे गटाचे उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी यांनी पुराव्यानिशी केला आहे.
कृष्णा धुरी यांनी सांगितले की, भाजप पक्षाच्या माध्यमातून सत्तेचा दुरुपयोग करून दादा बेळणेकर यांनी शासनाचा निधी लाटला आहे. सामान्य शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी वन विभागाचे अधिकारी अनेक कागदपत्रे मागतात,अनेक निकष लावतात. मात्र दादा बेळणेकर यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संगनमत करून तीन लाख रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुकाप्रमुख कृष्णा धुरी यांनी पुराव्यानिशी हा भ्रष्टाचार उघड केला आहे. याची चौकशी होऊन दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास शिवसेना पक्षाच्या माध्यमातून वनविभागाच्या मुख्य कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कृष्णा धुरी यांनी दिला आहे.

ruchira top