शिवसेना शाखा, वडाचापाट व अनंत पाटकर मित्रमंडळ यांचे आयोजन
मालवण : शिवसेना शाखा वडाचापाट व अनंत पाटकर मित्रमंडळ तर्फे हॉटेल समर्थ, मसदे तिठा येथे नारळी पौर्णिमे निमित्त नारळ लढविणे स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.रविवार दि.18 ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजता या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
या स्पर्धेकरिता प्रत्येक स्पर्धकास एकूण पाच नारळ देण्यात येतील.

यातील अंतिम फेरीत पोहोचणाऱ्या दोन स्पर्धकांना प्रथम क्रमांकास रोख रुपये 3500/- व चषक तसेच द्वितीय क्रमांकास रोख रुपये 1500/- व चषक बक्षीस स्वरूपात देण्यात येईल.तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन रोहन पालव यांनी केले आहे.

