त्या कामांबाबत झाली धोरणात्मक चर्चा
मालवण : मालवण येथे मालवण तालुका शासकीय ठेकेदार व निमशासकीय ठेकेदार यांची बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.
तालुक्याबाहेरील ठेकेदार मालवण तालुक्यातील कामे भरतात, हे कुठे तरी चर्चेतून सुटावं, त्यावर आळा बसावं, स्थानिकांना प्राधान्य मिळावे. या करता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
मालवण तालुक्यातील काम ही मालवण मधील ठेकेदार यांना मिळावी. त्यांनी कामे घ्यावीत. तालुक्याच्या बाहेरील ठेकेदार काम करत असतील तर त्यांच्यावर तालुका संघटनेमार्फत योग्य ती भुमिका मांडली जावी. स्थानिकांचा विचार गरजेचा आहे. असेही चेर्चेतून पुढे आले.
मालवण तालुक्यात बरीच विकास कामे ही बाहेरचे ठेकेदार येऊन करतात, तसे होता नये, असा निर्णय या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. या बैठकीला मालवण तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार, अभियंता तसेच ओपन कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.

