Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी व सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात ५५ वर्षांनंतर मोठी वाढ

सिंधुदुर्ग किल्ल्यातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी व सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात ५५ वर्षांनंतर मोठी वाढ

वर्षाला ३००० अनुदान मिळत होते, आता मिळणार वार्षिक १ लाख

आमदार निलेश राणे, देवस्थान न्यास यांच्या पाठपुराव्याला यश

मालवण | प्रतिनिधी : किल्ले सिंधुदुर्ग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी तसेच सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात महाराष्ट्र शासनाने वाढ केली आहे. 1970 पासून 250 रुपये मासिक तसेच वर्षाला 3,000 मिळणाऱ्या मानधनात 55 वर्षे कोणतीच वाढ झाली नव्हती. याबाबत ,आमदार निलेश राणे, व देवस्थान न्यास, यांनी शासनाचे लक्ष वेधले. त्यानुसार राज्य शासनाने तात्काळ कार्यवाही करतं प्रतिमाह 8,333 तर वर्षाला 1 लाख इतकी अनुदानात वाढ केली आहे.
महाराष्ट्र शासन महसूल विभागाच्या माध्यमातून याबाबत शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,पालकमंत्री नितेश राणे यांसह राज्य शासनाचे आभार मानण्यात आले आहेत.
सन १९७० पासून अनुदानात वाढ करण्यात आलेले नाही. याबाबत सिंधुदुर्ग किल्ला श्री. शिवराजेश्वर देवस्थान न्यास विश्वस्त यांनी दि. १४ फेब्रुवारी २०२० रोजी अनुदान वाढ बाबत निवेदनद्वारे शासनाचे लक्ष वेधले. श्री. शिवराजेश्वर देवालयातील पुजारी व इतर सेवेकरी यांचे पगार, मंदिराच्या दिवाबत्तीचा खर्च तसेच, मंदिराकडून आयोजित करण्यात येत असलेले उत्सव याकरीता सदरहू अनुदानाची रक्कम अत्यंत कमी पडत असल्याने अनुदानात वाढ करण्याबाबत विनंती करण्यात आली.

आमदार निलेश राणे यांनी वेधले होते लक्ष

सिंधुदुर्ग किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे श्री शिवराजेश्वर हे एकमेव ऐतिहासिक मंदिर आहे. सदर मंदिराचे व्यवस्थापन पाहणा-या देवस्थान न्यासाला महसुल विभागाकडून सन 1971 पासून पुर्जाअर्चनेसाठी मासिक २५०/- या प्रमाणे मानधन देण्यात येते. सदर मानधनात सन १९७१ पासून कोणतीच वाढ झालेली नाही. त्यामुळे आजच्या महागाईच्या तुलनेत न्यासाला मिळणारे मानधन हे अत्यंत तुटपुंजे असून सदर मानधनात वाढ होणे आवश्यक आहे. किमान १,००,०००/ रुपयांचे मानधन देवस्थान न्यासाला मिळावे. असे निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट करत आमदार निलेश राणे यांनी शासनाचे लक्ष वेधले होते.
आता मिळणार 1 लाख अनुदान

विश्वस्त, श्री. शिवराजेश्वर देवस्थान न्यास, सिंधुदूर्ग किल्ला तसेच पालकमंत्री नितेश राणे,आमदार निलेश राणे, यांच्या मागणी अनुषंगाने, सिंधुदूर्ग किल्ला येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या श्री शिवराजेश्वर मंदिराच्या दिवाबत्ती, पुजारी तसेच सेवेकऱ्यांच्या मानधनावरील खर्च अनुदानात प्रतिमाह रू.८३३३/- प्रमाणे वर्षभरात रू. १ लाख इतके अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

ruchira top