भारतीय जनता पार्टी मालवण तालुका आयोजित आणि भाजपा नेते निलेश राणे पुरस्कृत भव्य स्वरूपातील नारळ लढविणे स्पर्धा
जुबेर खान |मालवण : भारतीय जनता पार्टी आयोजित आणि भाजपा नेते निलेश राणे पुरस्कृत भव्य दिव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवीन बंदर जेटी मालवण येथे 19 ऑगस्ट स्पर्धा संपन्न होणार आहे.
स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम क्रमांक १ लाख रुपये द्वितीय क्रमांक २५ हजार रुपये व आकर्षक चषक देण्यात येणार आहे.

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाकडे पाणी असणारे पाच नारळ असणे गरजेचे आहे तसेच जर नारळ खराब निघाला तर तो स्पर्धक बाद करण्यात येणार आहे. स्पर्धा ही हातावर खेळवली जाणार आहे. या स्पर्धेमध्ये प्रथम येणाऱ्या 24 स्पर्धक संघांना प्राधान्य दिले जाणार आहे,तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी मालवण तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ललित चव्हाण- ९०९६७२८०४८, पंकज सादये- ९५०३९५०१११ विष्णू मोंडकर - ९४२११५३०३५ यांच्याशी संपर्क साधावा.

