मालवण | प्रतिनिधी :- मालवण तालुक्यातील वडाचापाट रेशन दुकान जवळ येथील महापुरुष देवस्थान येथे श्री राजेंद्र प्रभूदेसाई कुटुंबिय व मित्रमंडळ यांच्या वतीने गुरुवार 21 मे रोजी सकाळी 9 वाजता श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री महापुरुष देवस्थान पूजे निमित्त रात्री 9 वाजता दांडेली ओरस येथील जय हनुमान पारंपरिक दशवतार नाट्यमंडळ दांडेली आरोस यांचा ब्रम्हकुंड परिक्रमा हा दशावतारी नाट्यप्रयोग होणार आहे. भाविक भक्तांनी यां कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री राजेंद्र प्रभुदेसाई कुटुंबीय आणि मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

