कोलकाता येथील घटनेचा निषेध
भाऊ भोगले | बागायत : कोलकाता मधील मेडिकल कॉलेजच्या स्त्री डाॅक्टरवर झालेल्या सामूहिक अत्याचार व खून प्रकरणाचा जाहीर निषेध करण्यासाठी एकदिवसीय
देशव्यापी बंदमध्ये मालवण तालुक्यातील तसेच शहरातील सर्व डॉक्टर सहभागी होत असून शनिवार दि. १७ ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा मूक मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा लिमये हॉस्पिटल भरड नाका बाजारपेठ मार्गे फोकंडा पिंपळ पोस्ट ऑफिस मार्गे लिमये हॉस्पिटल असा असणार आहे .
स्वातंत्र्याच्या 78 वर्षा नंतरही स्त्री (फक्त डॉक्टरच नव्हे) ही कामाच्या ठिकाणी किंवा घरा बाहेर सुरक्षित नाहीये. हेच या घटनेतून निदर्शनास येत आहे आणि त्याचाच निषेध म्हणून उद्या सर्वत्र अत्यावश्यक सेवा वगळता बाह्यरुग्ण विभाग/ओपीडी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
या निर्घृण कृत्याच्या निषेधार्थ सर्वांनी यात सहभागी होऊन स्त्रीशक्तीचे प्रदर्शन करूया यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने या मूक मोर्चा मधे सामिल व्हावे. असे आवाहन डॉक्टर्स फ्रॅटर्निटी क्लब सिंधुदुर्ग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

