Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

महिलेला फसवून बेळगाव येथे नेऊन अत्याचार

गुन्हा दाखल ; संशयीत फरारी

कुडाळ : पतीची दारू सोडविण्यासाठी आंबोलीला जाऊया म्हणून सांगून महिलेला बेळगावला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी संशयित चंद्रकांत सखाराम मराठे (रा. घावनाळे बामणादेवी, ता. कुडाळ) याच्यावर वेंगुर्ले पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल होऊन तो कुडाळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. दरम्यान संशयीत चंद्रकांत मराठे फरारी असून त्याचा शोध सुरु असल्याची माहिती कुडाळ पोलीस ठाण्यातून देण्यात आली.
कुडाळ तालुक्यातील पीडित महिलेने याबाबत फिर्याद दिली आहे. त्यानुसार संशयित चंद्रकांत सखाराम मराठे याने पतीची दारू सोडविण्यासाठी आंबोलीला जाऊया म्हणून सांगून आपल्या चार चाकी गाडीतून बेळगाव येथे त्याच्या मित्राच्या घरी तिला गेला. तिथे फिर्यादी झोपेत असताना आरोपीने तिच्यावर अत्याचार केला आणि जिवंत जाळून मारून टाकीन अशी धमकी दिली. तसेच व्हिडिओ बनवून कोणाला सांगितले तर व्हिडिओ सर्वांना पाठविण्याची धमकी सुद्धा दिली. हि घटना दि. २३ जुलै २०२४ रोजी रोजी सायंकाळी ४.४५ ते २४ जुलै २०२४ रोजी पहाटे २ वाजताचे मुदतीत घडली.
या प्रकरणी फिर्यादीने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असता संशयित कुडाळ तालुक्यातील असल्याने वेंगुर्ले पोलीस ठाण्यात शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल होऊन तो कुडाळ पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला. संशयित चंद्रकांत सखाराम मराठे याच्यावर भारतीय न्याय संहिता कलम 351(3),64(2)(m)प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या संशयित फरारी असून त्याचा शोध घेणायचे काम सुरु आहे, अशी माहिती कुडाळ पोलिसांनी दिली. या प्रकरणी पोलीस उप निरीक्षक श्री. वाघाटे कुडाळ पोलीस ठाणे हे अधिक तपस करीत आहेत.

ruchira top