३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता
'या' तारीख पर्यत देण्यात आला इशारा

सिंधुदुर्ग : प्रादेशिक हवामान विभाग, मुंबई यांचेकडून प्राप्त माहितीनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात दि.१६ ऑगस्ट २०२४ ते दि.२० ऑगस्ट २०२४ या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तसेच दि.१६ ऑगस्ट २०२४ ते दि.२० ऑगस्ट २०२४ या कालावधीत जिल्ह्यात गडगडाट होवून पाऊस पडण्याची व विजा चमकण्याची तसेच ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कालावधीत नागरिकांनी दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सिंधुदुर्ग मार्फत करण्यात येत आहे.

