Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

उद्या जिल्ह्यात वैद्यकीय सेवा बंद

इंडियन मेडिकल असोसिएशन सिंधुदुर्गतर्फे कोलकाता येथील त्या अमानुष घटनेचा निषेध

जिल्ह्यातील आपत्कालीन आणि अपघात सेवा मात्र राहणार सुरु

कुडाळ : कोलकाता येथील आर जी कार मेडिकल कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने शनिवारी १७ ऑगस्ट रोजी देशव्यापी वैद्यकीय सेवा बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने उद्या १७ ऑगस्ट रोजी सकाळी ६ ते १८ ऑगस्ट रोजी सकाळी ६ वाजे पर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैद्यकीय सेवा बंद राहणार आहेत. अशी माहिती आयएमएच्या वतीने डॉ. संजय केसरे यांनी दिली आहे. या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे.

डॉ. केसरे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रानुसार कोलकाता येथिल महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर त्या घटनेचा निषेध म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स आपले ओपीडी, नॉन इमर्जन्सी ,तसेच टाळता येण्यासारखे ऑपरेशन्स या सर्विसेस पूर्ण 24 तासासाठी बंद करणार आहेत. या कालावधीमध्ये आपत्कालीन सेवा तसेच अपघात सेवा सुरू राहणार आहेत.

डॉक्टरांवरील हिंसाचाराचा विरोध करण्यासाठी या आधी नॅशनल IMA मार्फत मोर्चे निवेदने तसेच जनजागृती करण्यात आलेली आहे. परंतु सरकारकडून ठोस कार्यवाही न झाल्यामुळे आजही वैद्यकीय मंडळी असुरक्षिततेच्या वातावरणात वावरत आहेत. उच्चशिक्षित असूनही डॉक्टरांना सुरक्षा नाही याचा आम्ही निषेध करतो आणि या घटना तात्काळ बंद झाल्या पाहिजेत असे आवाहन IMA सिंधुदुर्ग तर्फे करण्यात आले आहे. दरम्यान इंडियन मेडिकल असोसिएशन सिंधुदुर्गच्या वतीने या बाबतचे निवेदन जिल्हाधिकारी याना देण्यात आले आहे.

ruchira top