गिअर अप जिम अँड फिटनेस सेंटर , सिद्धिविनायक मित्र मंडळ व उत्तम गावडे मित्र मंडळ यांचे आयोजन
कुडाळ: कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे गिअर अप जिम अँड फिटनेस सेंटर ,सिद्धिविनायक मित्र मंडळ व उत्तम गावडे मित्र मंडळ आयोजित भव्य दिव्य नारळ लढविणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. पिंगुळी म्हापसेकर तिठा, अभिषेक वडापाव सेंटर समोर या स्पर्धा संपन्न होणार आहेत.
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे गिअर अप जिम अँड फिटनेस सेंटर सिद्धिविनायक मित्र मंडळ व उत्तम गावडे मित्र मंडळ यांच्या वतीने नारळ लढविणे स्पर्धा आयोजित केल्या आहेत. दि. १९ ऑगस्ट रोजी या स्पर्धा होणार असून दुपारी तीन वाजता स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक ३, ००१ व चषक (बक्षीस ऋषिकेश बरवे व चषक समीर मयेकर ) आणि द्वितीय पारितोषिक २,००१ व चषक( बक्षीस बाबल गावडे व दीपक गावडे. चषक समीर मयेकर ) देण्यात येणार आहे.या स्पर्धेची प्रवेश फी २०० रुपये असून मंडळाकडून ५ नारळ देण्यात येणार आहेत.
या स्पर्धेची नावनोंदणी १८ ऑगस्ट पर्यंत स्पर्धकांना करता येणार आहे.तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन सिद्धिविनायक मित्रमंडळ आणि उत्तम गावडे मित्रमंडळ यांच्यावतीने करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी दिनेश चव्हाण ९४०४२६७००३, संतोष गावडे ९६३७४४५१४३, अभिषेक गावडे ८३९०४३८८८५ यांच्याशी संपर्क साधावा.

