भाजपाच्या 'या' नेत्यांना आ. वैभव नाईक पक्ष प्रवेशासाठी भेटले
मात्र पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेड सिग्नल दिला आणि….
धोंडी चिंदरकर यांनी सांगितले…
मालवण | प्रतिनिधी : आ. वैभव नाईक भाजपात पक्ष पक्षप्रवेशासाठी भाजपा वरिष्ठ नेते मंडळी यांचे उंबरे झिजवत होते. मात्र कोकण भाजपा प्रभारी तथा मंत्री रवींद्र चव्हाण यांनी रेड सिग्नल दिला आणि आ. वैभव नाईक यांचा प्रवेश मार्ग बंद झाला. भाजपा जेष्ठ नेते नारायण राणे, मंत्री रवींद्र चव्हाण यांचा शब्ब्द महत्वाचा असतो. त्यांचा विरोध तर कोणतीही प्रक्रिया पुढे नाही होत.
आ. वैभव नाईक हे भाजपा नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले. त्या बरोबर ते कोणाकोणाला भेटले त्यांचे पुरावे लवकरच समोर आणू. त्यामुळे त्यांनी निष्ठेच्या गोष्टी करू नये. असे सांगत भाजपा मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी राजकीय खळबळ उडवून दिली.

