आचरा : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा जिल्हापरिषद मतदारसंघ व सिंहगर्जना ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने नारळ लढविणे स्पर्धा शुक्रवार १६ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता आचरा तिठा येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या स्पर्धकांना अनुक्रमे ५ हजार, ३ हजार रुपये व आकर्षक चषक देवून गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, आचरा विभाग व सिंहगर्जना ग्रुप सर्व पदाधिकारी व शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विभागप्रमुख समीर लब्दे यांनी केले आहे.

