भाजप पुरस्कृत चेतन साळकर मित्र मंडळ आयोजित नारळ लढविणे स्पर्धा संपन्न
भाऊ भोगले| बागायत : 15 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या भाजप पुरस्कृत चेतन साळकर मित्र मंडळ आयोजित नारळ लढविण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक आंगणेवाडीचा अमृत परब तर द्वितीय क्रमांक शुभम जाधव यांनी पटकावला. यावेळी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये 2000 आकर्षक चषक आणि श्रीफळ श्री गौतम (मुन्ना) खोत यांच्या हस्ते अमृत परब याला देण्यात आले. तर द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रुपये 1000 आकर्षक चषक आणि श्रीफळ माजी सैनिक श्री विश्वास (बाळू ) तोंडवळकर यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी वडाचापाट गावचे प्रतिष्ठित व्यावसायिक दयानंद देसाई उपस्थित होते.
या स्पर्धेचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे बाल स्पर्धकांची संख्या मोठ्यांसोबत छोट्या स्पर्धकांनीही तेवढ्यात ताकतीने आणि हिमतीने नारळ लढवून जमलेल्या सर्वांचे लक्ष वेधले. या स्पर्धेला मोठ्या संख्येने स्पर्धा शौकीन उपस्थित होते. सर्व स्पर्धकांचे तसेच जमलेल्या सर्वांचे व मंडळाच्या कार्यकर्त्यांचे श्री चेतन साळकर यांनी आभार मानले.

