Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

किनारपट्टीची 'लो होल्टेज'ची समस्या संपणार…

मालवण किनारपट्टीवरील मच्छिमार पर्यटन व्यवसायिक व स्थानिक रहिवाशांना मिळणार दिलासा

भाजपा नेते निलेश राणे यांचा यशस्वी पाठपुरावा ; पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून ७ नवीन ट्रान्सफार्मर मंजूर

मालवण : मालवण किनारपट्टीवर गेल्या अनेक वर्षापासून 'लो' हॉल्टेजची समस्या आहे. हॉटेल-लॉजची वाढलेली संख्या, विजेवर आधारित पर्यटन व्यवसाय यामुळे किनारपट्टीनजीकच्या स्थानिक रहिवासी, मच्छिमार तसेच पर्यटन व्यवसायिक यांना मोठ्या समस्येचा सामना करावा लागत होता.

काही दिवसांपूर्वीच वायरी येथे पर्यटन व्यवसायिकांनी बैठक घेऊन आपली कैफियत भाजपा नेते निलेश राणे यांच्यासमोर मांडली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हा वार्षिक योजनेतून किनारपट्टीलगतच्या गावांना ट्रान्सफार्मरसाठी निधी मिळावा अशी मागणी निलेश राणे यांनी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व खासदार नारायणराव राणे यांच्या जवळ केली होती. त्यानुसार जिल्हा वार्षिक योजनेतून किनारपट्टीलगतच्या गावात पहिल्या टप्यात ७ ट्रान्सफार्मर मंजूर करण्यात आले आहेत.

मालवण तालुक्यातील आचरा समर्थ नगर येथे ट्रान्सफर्मर बसविणे, तारकर्ली नवीन दत्त मंदिर नजीक ट्रान्सफार्मर बसविणे, वायरी भूतनाथ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा नजीक ट्रान्सफार्मर बसविणे, वायरी आचरेकर कंपाउंड येथे ट्रान्सफार्मर बसविणे, कुंभारमाठ गोवेकर दुकान येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे. घुमडे घूमडाइ मंदिर येथे ट्रान्सफॉर्मर बसविणे, माऊली मंदिर चिंदर येथे ट्रान्सफार्मर बसविणे. या कामांना पहिल्या टप्यात मंजुरी देण्यात आली आहे.

किनारपट्टीनजीकच्या गावांना प्राधान्याने निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार नारायणराव राणे, भाजपा नेते निलेश राणे यांचे भाजपा तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, सरचिटणीस महेश मांजरेकर, माजी जि. प. अध्यक्ष अशोक सावंत, मालवण शहराध्यक्ष बाबा मोंडकर, मच्छिमार नेते दाजी सावजी, जिल्हा उपाध्यक्ष युवा मोर्चा सिंधुदुर्ग आशिष हडकर आदी भाजपा पदाधिकाऱ्यांनी आभार व्यक्त केले आहेत.

ruchira top