भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांनी वेधले तहसीलदार यांचे लक्ष
मालवण | प्रतिनिधी : मालवण शहरांत पोलीस पाटील पद रिक्त आहे. ही पदे भराणा करण्याबाबत कोणतेही आदेश नसल्याने मालवण शहरात पोलीस पाटील कार्यरत नाहीत. याचा परिणाम नागरिकांना दाखले मिळताना होत आहे. दाखले मिळवण्यासाठी नागरिकांना हेलपाटे घालावे लागत आहेत. तरी याबाबत प्रशासनाच्या स्तरावर योग्य ती कार्यवाही व्हावी. अशी मागणी भाजपा माजी नगरसेवक दीपक पाटकर यांच्या वतीने तहसीलदार वर्षा झालटे यांच्याकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, याबाबत वरिष्ठ स्तरावर माहिती देण्यात आली आहे. जसे आदेश प्राप्त होतील त्यानुसार कार्यवाही केली जाईल. अशी माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.
या चर्चे दरम्यान माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक आप्पा लुडबे, काँग्रेस पदाधिकारी बाळू अंधारी, माजी नगरसेविका जयमाला मयेकर यांसह अन्य उपस्थित यांनीही मालवण शहरातील पोलीस पाटील प्रश्न सोडवण्याची मागणी केली.

