Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्यक्रम लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन
rapan bottom

'ऑपरेशन क्लीन सी’ कारवाईचा धडाका

'ऑपरेशन क्लीन सी’ कारवाईचा धडाका

LED मासेमारी करणारी देवगडची नौका जप्त ; सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची कारवाई : मच्छिमारांना मोठा दिलासा

मालवण | प्रतिनिधी : मत्स्यव्यवसाय विभागाने ‘ऑपरेशन क्लीन सी’ अंतर्गत कठोर कारवाई सुरू केली असून, सोमवारी रात्री उशिरा विजयदुर्ग समोरच्या समुद्रात LED पद्धतीने अवैध मासेमारी करणारी देवगड येथील एक नौका जप्त करण्यात आली. ही मोहीम जिल्ह्यातील छोट्या मच्छिमारांना मोठा दिलासा देणारी ठरली आहे.

१४ एप्रिल २०२६ रोजी देवगड परवाना अधिकारी किरण वाघमारे यांच्या नेतृत्वात नियमित गस्तीदरम्यान ही कारवाई घडली. विजयदुर्ग समोर साधारण २० वाव (फॅदम) पाण्याच्या खोलीत, किनाऱ्यापासून 9 समुद्री मैल अंतरावर अमीना (AMINA) IND-MH-5-MM-647 या नोंदणीकृत नौकेद्वारे LED लाइट्सचा वापर करून मासेमारी सुरू होती. रात्री 1 वाजण्याच्या सुमारास मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने नौकेवर धाड घातली. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू केली.

किरण वाघमारे यांनी देवगड सुरक्षा रक्षक बांधकर, खवले, टुकरुल, फाटक, नेसवनकर आणि सावजी यांच्या मदतीने ही कारवाई यशस्वी केली. या नौकेचे मालक व चालक देवगड येथील असल्याचे समजते. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय श्री. सागर कुवेसकर यांनी ‘ऑपरेशन क्लीन सी’ अंतर्गत ही विशेष मोहीम राबविली आहे. समुद्रातील अवैध LED मासेमारी रोखण्यासाठी विभाग सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

यशस्वी कारवाईमुळे देवगड, विजयदुर्ग, मालवणसह संपूर्ण किनारपट्टीवरील मच्छिमार समुदायात समाधानाचे वातावरण आहे. “अखेर सरकार आणि विभागाने आमच्या अडचणींकडे लक्ष दिले. LED मासेमारी करणाऱ्यांना आता धाबे दणाणले आहेत,” अशी भावना स्थानिक मच्छिमारांनी व्यक्त केली.

ruchira top