आमदार निलेश राणे यांची प्रमुख उपस्थिती
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत तब्बल ४ कोटी ५० लाख निधी मंजूर
कुडाळ : पांग्रड येथील ऐतिहासिक महादेव मंदिर तळी पर्यटन दृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत तब्बल ₹४ कोटी ५० लाख निधी आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे. या तळी सुशोभीकरणाच्या कामाचा भव्य पायाभरणी समारंभ आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख श्री. दत्ता सामंत, जि. प. उपाध्यक्ष श्री. दादा साईल, श्री. संजय पडते, श्री. काका कुडाळकर, शिवसेना महिला जिल्हाध्यक्षा सौ. दिपलक्ष्मी पडते, कुडाळ सभापती श्री. मिलिंद नाईक, सौ. संध्या तेरसे, श्री. दीपक नारकर, श्री. नागेश आईर, श्री. रूपेश कानडे, पांग्रड सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


