हिंदू एकजुटीची पदयात्रा
कुडाळ: बांगलादेश मध्ये हिंदू बांधवांवर अत्याचार करून त्यांची कुटुंब उध्वस्त करण्यात आली. या निषेधार्थ हिंदू बांधवांची एकजूट दाखवण्यासाठी तसेच सर्व भारतीय हिंदू बांधव त्यांच्यासोबत आहोत, याची जाणीव जगाला करून देण्यासाठी पिंगुळी गावातील सकल हिंदू समाजाच्या वतीने मुक पदयात्रा 15 ऑगस्ट रोजी काढण्यात आली.
यावेळी ग्रामस्थ, महिला भगिनी, लोकप्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.

एमआयडीसी सर्कल (दीपक गावडे) यांच्या दुकानापासून ते गणपती मंदिर पिंगुळी तिठा येथे या पदयात्रेचा समारोप झाला.
आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचाव्यात, याकरिता सकल हिंदू समाजाच्या वतीने सरपंच पिंगुळी यांना निवेदन देण्यात आले.

