कुडाळ | प्रतिनिधी : १५ वा वित्त आयोगातील कामे पूर्ण करून कामाचे पैसे न दिल्याचा आरोप करत सिव्हील इंजिनियर शुभम पेडणेकर यांनी लाक्षणिक उपोषण छेडले आहे.
पावशी हायवे ते जि.प.शाळा नं.१ कडे जाणारा रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे. पावशी हायवे ते भरणकर घर रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे, पावशी येथे अनंत केसरकर ते श्रीधर केसरकर घर रस्ता खडीकरण, डांबरीकरण करणे.
सदर कामांची मोजमाप वही ग्रामपंचायतीत जमा केलेली असून कामांची देयके अदा करणेसाठी लागणारी सर्व कागदपत्रे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी यांचेकडे जमा केली आहेत. वेळोवेळी देयक अदा करणेबाबत ग्रामपंचायतीला विचारणा केली असता नेटवर्क चा प्रॉब्लेम सांगून टाळाटाळ होत आहे. उपासमारीची वेळ आली आहे, आणि सदरचा विलंब होत आहे याची विचारणा करावी, असे निवेदनाद्वारे म्हणले आहे.
मात्र या बाबतीत दुर्लक्ष झाल्यामुळे पेडणेकर यांनी १५ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कुडाळ कार्यालयाच्या बाहेर लाक्षणिक उपोषण केले आहे.

