Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

'चलो बुलावा आया है, मेरे साई ने बुलाया है!'

आकर्षक चित्ररथांनी दुमदुमली शिर्डी नगरी

श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळाची ३० वर्षांची परंपरा

पौराणिक कथांवर आधारित आकर्षक देखावे

कुडाळ : 'चलो बुलावा आया है, मेरे साई ने बुलाया है !' हि भावना कुडाळच्या श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळाची असते आणि या भावनेतूनच शिर्डी येथे श्रावणात सुरु होणाऱ्या श्री साई सच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळ गेली तीस वर्ष ही परंपरा अखंडपणे जपत आहे. यंदा देखील श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळाच्या वतीने पौराणिक कथांवर आधारित तीन देखाव्यांनी शिर्डीवासीयांची मन जिंकली.

दरवर्षीच्या श्रावण महिन्यांमध्ये शिर्डीमध्ये साईबाबा संस्थाच्या वतीने श्री साईबाबा चरित्रावर पारायण सोहळा आयोजित केला जातो. कित्येक वर्षांची ही परंपरा आहे. या सोहळ्यानिमित्त भजन, कीर्तन, चित्ररथ, ग्रंथ मिरवणूक, विविध गीतांचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या सोहळ्यामध्ये तीस वर्षापासून कुडाळ येथील श्री देव कुडाळेश्वर मित्र मंडळाच्या कलावंतांना विशेष निमंत्रित केलं जातं. हे सर्व कलावंत या सोहळ्यामध्ये भजन, भजन संध्या, मराठी गीतांच, सादरीकरण 'चैत्र पालवी' सारखे मराठी ऑर्केस्ट्रा सादर करतात.

नुकत्याच झालेल्या या सोहळ्यामध्ये कुडाळेश्वर मित्र मंडळातर्फे रथावर आरूढ झालेले श्री शनिदेव, चांगदेव गर्वहरण आणि श्रीराम पंचायतन असे तीन चित्ररथ देखावे सादर करण्यात आले. यामध्ये शनिदेवाच्या भूमिकेमध्ये आनंद अणावकर, चांगदेवाच्या भूमिकेत मंदार कुंटे, मारुतीच्या भूमिकेत अनिकेत घाटकर हे कुडाळेश्वर मित्र मंडळाचे कलाकार होते. तर काही शिर्डीच्या कलाकारांनी देखील या चित्ररथामध्ये भूमिका साकारल्या. त्यामध्ये श्रीराम - सूर्यकांत गोंदकर, सीता माउली - सौ वैष्णवी गोंदकर त्याचबरोबर शिर्डीतील अनेक बालकलाकार सहभागी झाले होते.

यांसह महेश काणेकर, सत्यवान राऊळ, रुपेश कुडाळकर, चंदन दळवी, राकेश राऊळ, गजानन घाटकर, सुशील परब, प्रतीक राऊळ, केदार राऊळ, आबा आईर, कपिल परब, केदार राऊळ, महेश उर्फ गोपाळ राऊळ, सुशांत राऊळ, महेश मडवळ, तन्मय घाटकर, शशांक राऊळ, संकल्प दळवी, रमेश मेस्त्री, सचिन कोंडस्कर, अभिषेक काटकर, संदेश घाटकर आणि कुडाळेश्वर मित्र मंडळाच्या कल्पकतेतून आणि बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर यांच्या विशेष सहकार्यातून हे आकर्षक चित्ररथ साकार झाले. या चित्ररथाना शिर्डीतल्या साईभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कुडाळेश्वर मित्र मंडळाच्या सलग तीस वर्षांच्या या सक्रिय सहभागाचं विशेष कौतुक केलं.

कुडाळमधून गेली तीस वर्ष सातत्याने शिर्डीमध्ये जाऊन वेगवेगळी कलासादर करून श्री साई सेवा करण्याचा श्री कुडाळेश्वर मित्र मंडळाचा हा प्रयत्न कौतुकास्पद आहे अश्या भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

ruchira top