Tuesday, 27 October 2026
Latest News
आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग.. आठ बंद बंगले चोरट्याने फोडले! तारकर्लीतील रापण नौका आग दुर्घटनेची मत्स्यव्यवसाय विभागाकडून पाहणी व पंचनामा.. उद्योजक राजन सरमळकर यांची सामाजिक बांधिलकी! भाग्यश्री मांजरेकर यांची म्हैसूरच्या ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’ साठी निवड लायन्स क्लब मालवणतर्फे जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त मार्गदर्श कार्य लायन्स क्लब मालवणतर्फे कन्याशाला येथे ‘जागतिक शांतता’ निबंध स्पर्धा उत्साहात संपन्न पर्ससीन मासेमारीविरुद्ध कठोर कारवाई; देवगडची ‘स्वामीराज’ नौका जप्त.. म्हैसूर येथील ‘वंदे मातरम् कॅम्प २०२६’साठी ॲड. ऐश्वर्य मांजरेकर यांची निवड जनसेवेचा वसा जपत उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांचा स्तुत्य उपक्रम! अवैध समुद्री मासेमारीला दणका! सिंधुदुर्गात २४८ नौकांवर २.२५ कोटींचा दंड सिंधुदुर्गच्या सागरी पर्यटनाची राष्ट्रीय स्तरावर मोहोर.. कांदळगावकर कुटुंबियांना भाजपाकडून दिलासा... वायरी मारुती मंदिर परिसरात विद्युत ट्रान्सफॉर्मरचे लोकार्पण.. आचरा वरचीवाडी येथे 'मालवणी ढाबा’ हॉटेलचे उद्घाटन तारकर्लीत रापण नौकांना भीषण आग..
rapan bottom

पत्रकार भूषण मेतर, शिक्षक प्रवीण कुबल व उद्योजिका पुष्पलता आजगावकर यांना पुरस्कार जाहीर

मातृत्व आधार फाउंडेशन संस्थेतर्फे होणार पुरस्कार प्रदान

मालवण | प्रतिनिधी : मालवणच्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मातृत्व आधार फाउंडेशनने आपल्या पाचव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींना पुरस्कार जाहीर केले असून दैनिक रत्नागिरी टाइम्सचे मालवणचे पत्रकार श्री. भूषण मेतर यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार तर रेकोबा माध्यमिक विद्यालय वायरी भूतनाथ मालवणचे शिक्षक श्री. प्रवीण कुबल यांना उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार आणि काळसे धामापूर येथील ज्येष्ठ उद्योजिका श्रीमती पुष्पलता आजगावकर आजी यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्काराचे वितरण स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजता वायरी येथील केळबाई मंदिर सभागृहात मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष श्री. संतोष लुडबे आणि सचिव दादा वेंगुर्लेकर यांनी दिली आहे.

भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला मातृत्व आधार फाउंडेशनने हे पुरस्कार जाहीर केले. गेली पाच वर्षे मालवणच्या सामाजिक क्षेत्रात मातृत्व आधार फाउंडेशन ही संस्था कार्य करीत असून या संस्थेचा पाचवा वर्धापन दिन दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी मालवणचे सुप्रसिद्ध डॉक्टर सुभाष दिघे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मालवणचे पोलीस निरीक्षक श्री. प्रवीण कोल्हे, मालवणच्या तहसीलदार वर्षा झाल्टे, पोस्ट ऑफिस मधील सेवानिवृत्त अधिकारी एम. डी. जोशी, दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष विनोद धुरी, साईकृपा अपंग सेवा संस्था कसालचे अध्यक्ष अनिल शिंगाडे, तसेच सर्व पक्षीय पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. यावेळी दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तसेच गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंचे वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन मातृत्व आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष लुडबे व सचिव दादा वेंगुर्लेकर यांनी केले आहे.

ruchira top