सकारात्मक चर्चा
ओरोस : सिंधुदुर्गनगरी येथील जनता दरबारात पोलीस पाटील भरतीत अंतिम निवड झालेल्या मालवण तालुक्यातील पोलीस पाटील उमेदवारांनी पालकमंत्री रविंद्र चव्हाण, भाजपा नेते निलेश राणे यांची भेट घेऊन निवेदन दिले.
दरम्यान, उमेदवारांना लवकरच नियुक्तीपत्र मिळतील असे पालकमंत्री यांनी आश्वस्त केले. असे सांगत सर्व उमेदवारांनी समाधान व्यक्त केले आहे.

कुडाळ तालुक्यातील उमेदवारांची बैठक
पोलिस पाटील भरती मधील अंतिम निवड होऊन नियुक्ती पत्राच्या प्रतीक्षेत असलेले कुडाळ तालुक्यातील सुमारे 40 उमेदवार यांनी एकत्र येऊन बैठक घेतली. दरम्यान, भाजपा नेते माजी खासदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्याकडे निवेदन दिले जाणार आहे. नियुक्तीपत्र लवकर मिळावे याबाबत कुडाळ प्रांत, जिल्हाधिकारी यांना देखील निवेदन देण्याविषयी चर्चा करण्यात आली.
यावेळी उपस्थितीताना सुनील खरात यांनी मार्गदर्शन केले. या सभेला वैभव धुरी, राजन शिंदे, सतीश माडये, समीर वालावलकर, विशाल चव्हाण, भिकाजी परब, दशरथ गोवेकर, समीक्षा सुकळी यांसह अन्य उमेदवार उपस्थित होते.

