युवा संदेश प्रतिष्ठान सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा
चिंदर | प्रतिनिधी : युवा संदेश प्रतिष्ठान तर्फे घेण्यात येणाऱ्या सिंधुदुर्ग टॅलेंट सर्च परीक्षा (STS) सन 23-2024 यामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंदर सडेवाडी या शाळेने उज्वल यश संपादन केले. या परीक्षेत कु. संस्कृती संजय लोके हिला सिल्वर मेडल तसेच आयुष अपसिंग वसावे याला सिल्वर मेडल तर कुमार देवांग धाकुनात गोसावी याला ब्रांझ मेडलप्राप्त झाले यांसह कु. मयुरी किरण कांबळी हिने देखील चांगले यश संपादन केले. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या वतीने आणि शाळा व्यवस्थापनाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

